UPSC Success Story : सोशल मीडियावर आयएएस आणि आयपीएस ऑफिसरची नेहमीच चर्चा होत असते. सध्या आयएएस सोनल गोयल (Sonal Goel) चर्चेत आल्या आहेत. गोयल यांच्या एका ट्विटमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर मेन्स (Mains Exam) एग्जामची मार्कशीट शेअर केली आहे. या मार्कशीटमुळे त्या चर्चेत आहेत. ही मार्कशीट शेअर करून सोनल गोयल यांनी त्यांची युपीएससीची जर्नी सांगितली आहे. त्यामुळे नेमकी त्यांची युपीएससीची जर्नी कशी होती? हे जाणून घेऊयात. (ias sonal goyal upsc success story share mains exam marksheet got 13 rank in second attemt struggle story)
ADVERTISEMENT
केंद्रीय लोकसेवा आयोगाची सिव्हील सर्विस परिक्षा ही देशातील सर्वात कठीन मानली जाणारी आणि प्रतिष्ठीत अशी परिक्षा आहे. लाखो तरूण-तरूणी या युपीएससी परिक्षेची तयारी करत असतात, मात्र मोजक्याच उमेदवारांना यामध्ये यश प्राप्त होते. अशाच उमेदवार आहेत सोनल गोयल. सोनल गोयल यांची आयएएस बनण्याची जर्नी तरूण उमेदवारांना प्रेरणा देणारी आहे.
कोण आहेत सोनल गोयल?
आयएएस ऑफिसर सोनल गोयल यांनी 2008 मध्ये युपीएससी परिक्षा पास केली होती. या परिक्षेत त्यांनी देशभरातून 13 वा क्रमांक पटकावला होता. हे यश मिळवल्यानंतर त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या. त्रिपुरामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. सध्या ते त्रिपुरा भवन, दिल्ली येथे निवासी आयुक्त पदावर आहेत.
हे ही वाचा : 'राजीनामा द्या', बाळासाहेबांचा आदेश अन् जोशींनी सोडलं होतं मुख्यमंत्रीपद
मार्कशीट सोशल मीडियावर पोस्ट
सोनल गोयल यांनी नुकतीच त्यांच्या एक्स अकाऊंटवर युपीएससी सिविल सर्विस मेन्स एग्जाम 2007 ची मार्कशीट शेअर केली होती. युपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रेरीत करण्यासाठी गोयल यांनी मार्कशीट शेअर केली होती. ही मार्कशीट शेअर करून गोयल यांनी त्यांची संर्घषाची कहानी सांगितली आहे.
युपीएससीसाठी तयारी करताना 2007 साली आपल्या पहिल्याच प्रयत्नात मला अपयश आले होते. पण त्यांनतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2008 साली युपीएससीची परिक्षा क्रॅक केली होती, असे सोनल गोयल यांनी सांगितले.
सोनल गोयल यांच्या पोस्टमध्ये काय?
' माझ्या पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षेत जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाल्याने मी मुलाखतीपर्यंत पोहोचू शकले नव्हते. या झटक्याने माझी युपीएससीत यश मिळवण्याचे उद्दीष्ट आणखी बळकट केले. आणि दुप्पट मेहनत करायला सुरूवात केली', असे सोनल गोयल सांगतात.
हे ही वाचा : 'अरे भाजपवाल्यांना आम्ही सरकारमध्ये आणलं', राणा विरुद्ध कडू वाद टोकाला
यानंतर जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये नोट्स बनवणे, वारंवार उजळणी करणे आणि उत्तरे लिहिणे यावर भर देऊन मुख्य विषयाच्या इतर बाबींमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. दिल्ली विद्यापीठातून एलएलबी करत असताना आणि सीएस (कंपनी सेक्रेटरी) म्हणून नोकरी करताना मी UPSC अभ्यासक्रमात माझं हृदय आणि आत्मा झोकून दिली.
दरम्यान पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर सोनलने हार मानली नाही. त्यांनी नोकरीसोबतच यूपीएससीची तयारी सुरूच ठेवली आणि दुसऱ्या प्रयत्नात यश संपादन केले. 'माझ्या दुसऱ्या प्रयत्नात मी केवळ परीक्षा उत्तीर्ण झाली नाही, तर जनरल स्टडीजमध्ये माझे गुण माझ्या ऐच्छिक विषयांच्या तुलनेत सर्वाधिक होते, असे गोयल यांनी सांगितले.
ADVERTISEMENT