IAS Tina Dabi : जैसलमेरच्या माजी जिल्हाधिकारी टीना डाबी या नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिल्या आहेत. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, निमित्त आहे, त्यांनी आता एका बाळाला जन्म दिला आहे. टीना डाबी यांनी एका जयपूरमधील रुग्णालयात त्यांनी मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी एका बाळाला जन्म दिल्याबद्दल आयएएस दाम्पत्य टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या बाळाच्या जन्माबद्दल आता दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुलगा रत्नाच्या जन्मामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
ADVERTISEMENT
टॉपर टीना डाबी
टीना डाबी या 2015 च्या आयएएस बॅचच्या टॉपर आणि राजस्थान केडरच्या प्रसिद्ध उच्च पदस्थ अधिकारी आहेत. टीना डाबी 5 जुलैपासून त्यांनी रजा घेतली होती. तर त्यांच्या जागी 2013 च्या बॅचचे आशिष गुप्ता यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीना डाबी यांनी त्यांच्या प्रेग्नन्सीमुळे राज्य सरकारला जयपूरमध्ये नॉन-फिल्ड पोस्टिंग देण्याची विनंती केली होती. त्यानंतर टीना डाबी प्रसूती रजेवर गेल्या. टीना यांनी 2022 मध्ये आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याबरोबर विवाह केला होता. त्यानंतर त्या पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या होत्या.
हे ही वाचा >> फसवणुकीचा अमृतकाल! ‘सामना’तून शिंदे सरकारचे वाभाडे
पाकिस्तानातील विस्थापितांच्या आधार
टीना डाबी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून जिल्हाधिकारी पद मिळाल्यापासून त्या चर्चेत राहिल्या आहेत. जैसलमेरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या हिंदू स्थलांतरितांचे जैसलमेरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी प्रचंड काम केले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या घर बांधणीपासून जमीन भाडेतत्वावर घेण्यापासून ते अगजी त्यांच्या जेवणाची आणि राहण्याच्या व्यवस्था करेपर्यंत त्यांनी विस्थांपितांसाठी काम केले होते. त्याच बरोबर विस्थापित नागरिकांच्या मुलांसाठीही त्यांनी शाळा उभारणीची काम केले होते.
पुत्ररत्न प्राप्ती होऊ दे
टीना डाबी यांच्या या बाळाचे पाकिस्तानातील विस्थापित महिलांनीही भरभरून कौतुक केले आहे. यावेळी त्यांना एका वृद्ध महिलेने आयएएस टीना यांना पुत्ररत्न प्राप्ती होऊ दे असा आशिर्वाद दिला होता. त्यावर त्यांनी टीना यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते की, मला मुलगा आणि मुलगी असा फरक करायचा नाही.
शिक्षणासाठी मोठं काम
टीना डाबी यांनी जैसलमेरमधील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी तीन महिने प्रयत्न करुन शिक्षणाची सोय केली होती. त्यामुळे त्यांच्या कामाची छाप जैसलमेरमध्ये कायम दिसून येत राहिली आहे.
हे ही वाचा >> Ganpati 2023: चाकमान्यानू बाप्पा पावले.. शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय!
फॉलोअर्सची प्रचंड संख्या
आयएएस असणाऱ्या टीना डाबी सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावरही त्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत. टीना डाबीचे इन्स्टाग्रामवर 16 लाखांहून अधिक फॉलोअर्स, तर ट्विटरवर 4.50 लाख फॉलोअर्स आणि फेसबुकवर 4.25 लाख फॉलोअर्स आहेत. टीना डाबी आई झाल्यानंतर त्यांच्यावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ADVERTISEMENT