Ram Mandir: कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर आता पूर्णत्वाकडे जात आहे. याच महिन्याच्या 22 तारखेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिराची जोरदार तयारी केली जात आहे. या मंदिराचे जसे सगळ्यांना आकर्षण आहे त्याच प्रमाणे मंदिरातील रामललाच्या मूर्तीचेही सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यातच आज रामललाची मूर्ती आज कोणत्या ठिकाणी बसवली जाणार आहे तेही आज स्पष्ट केले जाणार आहे. याबाबत एएनए वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या राम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तीला अंतिम रुप हे कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज (Sculptor Arun Yogiraj) यांनी दिले असल्याचे सांगितले आहे.
ADVERTISEMENT
‘रामलला’ सोशल मीडियावर
राम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तीबाबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करताना म्हटले आहे की, जिथं राम आहे, तिथं हनुमान आहे. त्यामुळे अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापनासाठी आता मूर्तींची निवड केली गेली आहे. देशातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी रामललाची बनवलेली मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आता अयोध्येच्या राम मंदिरात केली जाणार आहे.
हे ही वाचा >> पोटावरची चरबी झटपट होईल गायब, फक्त ‘याचा’ करा वापर
अधिकृत घोषणा नाही
मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मूर्तींची माहिती दिली असली तरी राम मंदिर ट्रस्टकडून याची अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्याचबरोबर ट्रस्टने हेही सांगितले नाही की, नेमकी कोणती मूर्ती निवडली गेली आहे. त्यामुळे ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी हेही सांगितले की, ज्यांना जे सांगायचे ते सध्या सांगत आहेत. मात्र मी सध्या काही बोलणार नाही. कारण अजून मूर्तीबाबत कोणताही निर्णयही झाला नाही.
पंतप्रधानांकडूनही कौतुक
म्हैसूरमधील अरुण योगीराज म्हणजे कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकारांच्या कुटुंबीयांपैकी एक आहेत. त्यांचे वडील योगीराज हे ही प्रसिद्ध शिल्पकार होते. तर त्यांचे आजोबा बसवन्ना शिल्पी यांना म्हैसूरच्या राजाने त्यांना संरक्षण दिले होते. अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तींना प्रचंड मागणी असते. अरुण योगीराज यांच्या मूर्तीचे काम बघून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांचे कौतुक केले होते. अरुण यांनी एमबीए केले असून त्यांनी काही काळ नंतर एका कंपनीत नोकरीही केली होती. मात्र कुटुंबाला लाभलेला मूर्ती कलेचा वारसा त्याला पुन्हा त्याला या कलेकडे खेचून आणले. या मूर्तीचे काम त्यांनी 2008 पासून सुरु केले होते.
राजघराण्याकडून गौरव
दिल्लीतील इंडिया गेटच्या मागे असलेली नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 30 फुटाचा पुतळा अरुण यांनीच बनवला आहे. तर केदारनाथमध्ये 12 फुटाची असलेली शंकराचार्यांची मूर्तीही त्यांनी बनवली आहे. तर म्हैसूर जिल्ह्यातील चुंचनकुट्टमध्ये असलेली 21 फुटाची हनुमानाचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 15 फुटाचा पुतळा अशा एक नाही अनेक पुतळे आणि मूर्ती त्यांनी बनवल्या आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच म्हैसूरमधील राजघराण्याकडूनही त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT