महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या श्री सदस्यांपैकी 13 सदस्यांचा मृत्यू झाला. 13 जणांचा मृत्यूचं कारण उष्माघाताने झाल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेवरून राजकारण तापलेलं असताना आता एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, आमदार जितेंद्र आव्हाडांनीही हा व्हिडीओ पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
16 एप्रिल रोजी खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर दुर्दैवी घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची सेवानिवृत्त न्यायमूर्ती मार्फत चौकशी करण्याची मागणीही आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. या घटनेसाठी विरोधकांनी राज्य सरकारला जबाबदार ठरवलं आहे. या घटनेची चर्चा सुरू असताना आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करतांना आव्हाडांनी प्रश्नही उपस्थित केला आहे. “समाज माध्यमांमधून हा व्हिडीओ आला आहे. हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते. हा चेंगराचेंगरीचा प्रकार कुठे घडला असावा?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवारांनी उपचार घेणाऱ्या श्री सदस्यांनी काय सांगितलेलं?
14 जणांच्या मृत्यूचे कारण प्रशासनाने उष्माघात सांगितलं आहे. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती, असं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या भेटीनंतर सांगितलं होतं.
हेही वाचा >> महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात श्री सदस्यांच्या मृत्यूनंतर अप्पासाहेब धर्माधिकारी काय बोलले?
अजित पवार म्हणाले होते की, “ज्यावेळी आम्ही इथे (एमजीएम रुग्णालय) पुरूष आणि महिलांना बोललो, तेव्हा बहुतेक जण पालघर, ठाणे, मुंबई शहर, पुणे जिल्ह्यातील लोणावळा वगैरे भागातील दिसले. त्यांनी सांगितलं की, आमच्या पोटात काही नव्हतं. काहींनी सांगितलं की, आम्ही फक्त फळं खाल्ली होती. पाण्याची व्यवस्था होती, पण उन्हाची तीव्र अतिशय होती. कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली, असं काहींनी सांगितलं. काहींना नंतर काय झालं माहिती नाही, दवाखान्यात आल्यानंतर त्यांना कळलं की आपल्याला दवाखान्यात आणलं आहे”, अशी माहिती अजित पवार यांनी रुग्णांच्या भेटीनंतर दिली होती.
Maharashtra Bhushan : मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची नावे
1) तुळशिराम भाऊ वागड
2) जयश्री जगन्नाथ पाटील
3) महेश नारायण गायकर
4) कलावती सिद्धराम वायचाळ
5) मंजूषा कृष्णा भोंबडे
6) भीमा कृष्णा साळवी
7) सविता संजय पवार
8) स्वप्नील सदाशिव केणी
9) पुष्पा मदन गायकर
10) वंदना जगन्नाथ पाटील
11) मिनाक्षी मोहन मेस्त्री
12) गुलाब बबन पाटील
13) विनायक हळदणकर
14) स्वाती राहुल वैद्य
ADVERTISEMENT