israel palestine war: गेल्या आठवड्यात पॅलेस्टिनी (Palestine) दहशतवादी संघटना हमासने (Terrorist organization Hamas) इस्रायलवर केलेल्या हल्ल्याने सारे जग हादरले. या हल्ल्यामुळे इस्रायल (Israel) हादरुन गेले आहे. तर आता सूड उगवलेल्या इस्रायलच्या सततच्या गोळीबारामुळे 2 लाख लोकसंख्या असलेला गाझा इमारतींचा प्रदेश मात्र स्मशानभूमीसारखा झाला आहे. सगळीकडे केवळ ढिगारेच ढिगारे आणि धुराचे लोट दिसू लागले आहेत. त्यामुळे आता युद्धात बळी पडलेल्या लोकांच्या भयानक आणि वेदनादायी अशा कथा समोर येऊ लागल्या आहेत. हल्ले प्रतिहल्ले सुरु असतानाच इस्रायलमधील एका मुलीने दहशतवाद्यांपासून स्वतःचे संरक्षण करत तिची आणि तिच्या कुटुंबीयांची शोकांतिका (Tragedy) तिने सांगितले आहे. तिच्या अनुभवाने साऱ्यांचेच हृदय हेलावून गेले आहे.
ADVERTISEMENT
लोकांची कत्तल
इस्त्रायलमधील 13 वर्षांच्या मुलीने एक आठवण सांगताना ती म्हणाली की, तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी हमासच्या दहशतवाद्यांपासून 16 तास लपून काढले. त्या सोळा तासात तिच्या शेजाऱ्यांची आणि तिच्या मित्रांची कत्तलच दहशतवाद्यांनी केली होती. रेनाना बोट्झर स्विसाने सीबीएस न्यूजच्या नोरा ओ’डोनेलच्या मुलाखती सांगितले की, ती शनिवारी सकाळी 6:22 वाजता किबुट्झ केफार आझा येथील तिच्या घरी अलार्मच्या आवाजाने उठली होती. मात्र नंतरची परिस्थिती तिच्यासाठी भयंकर होती.
हे ही वाचा >> Crime: 12 वर्षाच्या मुलीवर वासनांध बापाची घाणेरडी नजर, निर्जन स्थळी नेत पाशवी बलात्कार
जीव वाचण्यासाठी भीक
गाझाच्या हद्दीपासून काही अंतरावर राहणाऱ्या स्विसा तिच्या परिसरातील इतर लोकांप्रमाणेच ती तच्या घरात लपून बसली होती. ती आपल्या मुलाखतीत म्हणते की, मी आणि माझे कुटुंबीय 16 तास लपून बसलो होतो. त्यावेळी आमच्या जीवासाठी आम्ही फक्त भीक मागत होतो. कारण आमच्या समोर असलेल्या अनेका इमारतींना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते, आणि महिला व लहान मुलांच्या ते कत्तली करत सुटले होते.
अपहरण करुन बलात्कार
स्विसा रेनाना सांगते की, आमच्या घराचा दहशतवाद्यांनी जर दरवाजा तोडला असता तर मला भयंकर चित्र आठवत होते. कारण त्या काळात मी जर त्यांच्या तावडीत सापडले असते तर त्यांन माझ्यावर बलात्कारच केला असता. त्या काळात त्यांनी माझे अपहरणही केले असते किंवा त्यांनी मला ठारही मारले असते. ही भीती वाटत असतानाच माझ्या आईने मला जून 2024 मध्ये टेलर स्विफ्टच्या मैफिलीच्या तिकिटांचा विचार करायला लावला. त्यावेळी मला असं वाटलं की, मी जून 2024 पर्यंत नक्की जिवंत राहणार आहे.
इस्त्रायली सैन्याचा पुढाकार
रेनाना सांगते की, त्याच रात्री आम्हाला इस्त्रायली सैन्य वाचवण्यासाठी म्हणून आमच्याजवळ आले. तेव्हा मात्र आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. सैनिक आल्यानंतर मात्र आमची परिस्थिती बदलली होती. सैनिक आल्यानंतर नागरिकांच्या बचावासाठी आलेल्या सैनिकांच्या बसच्या दिशेने जाताना तिला वाचल्याचा आनंद झाला. मात्र तिचा जवळचा मित्र दहशतवादी हल्ल्यात ठार झाला होता. त्यामुळे या दुःखातून सावरण्यासाठी रेनाना धडपडत असल्याचे तिची आई इलानित यांनी सांगितले.
हे ही वाचा >> MLA Disqualification: ‘2 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश द्यावे लागतील..’, कोर्टाने नार्वेकरांना झापलं!
नवजात बालकांची कत्तल
हमासच्या क्रुरतेचं चित्रण करताना इस्त्रायली लष्करानी त्यांच्यातील भयंकर कृत्याची आठवण सांगितली आहे. इस्त्रायली सैनिक सांगतात की, ज्या परिसरात त्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तेथील नवजात बालकांनाही त्यांनी सोडले नाही, कारण कफार आझामध्ये एका नवजात बालकाचे डोके कापलेले आणि जळालेल्या अवस्थेत आढळले होते. त्या नवजात बालकाची नंतर ओळख पटणेही कठीण होऊन बसले.पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानेही ते भयानक चित्र प्रसिद्ध केले होते.
मृत्यूचा तांडव
इस्रायली सैन्याने गुरुवारी सांगितले की इस्रायलमधील 25 अमेरिकन लोकांसह 1200 हून अधिक लोकं मारले गेली आहेत. तर 2800 जण जखमी झाले आहेत. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायली प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये किमान 1,354 लोकं मारली गेली आहेत.
ADVERTISEMENT