Maratha Morcha : मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, तब्येतीलबद्दल पथकाने दिली माहिती

मुंबई तक

06 Sep 2023 (अपडेटेड: 06 Sep 2023, 05:45 AM)

Maratha Morcha : सरकारचे शिष्टमंडळ भेटूनही जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. मात्र आता त्यांची तब्बेत खालावल्याने त्यांना आता सलाईन लावण्यात आली आहे. सरकारचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Manoj jarange patil maratha kranti morcha jalna antrwali sarathi

Manoj jarange patil maratha kranti morcha jalna antrwali sarathi

follow google news

Manoj Jarange Patil : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमधील (Antrwali sarathi) आंदोलनावर लाठीहल्ला झाला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विनंती करत आंदोलनातील पोलीस हटवण्याची मागणी केली. त्यानंतर सरकारने आंदोलन मिठवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सरकारने अध्यादेश काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा थेट इशाराच सरकारला देण्यात आला. त्यानंतर काल सरकारच्या शिष्टमंडळाकडून पुन्हा एकदा आंदोलना मागे घेण्याचा प्रयत्न केला मात्र तोही असफल ठरला. त्यामुळे कालच जरांगे-पाटील यांनी सांगितले की, मी आंदोलन मागे घेणार नाही. त्यानंतर आता त्यांची प्रकृती आणखी खालवली असून त्यांना आता सलाईन लावून उपचाराला सुरुवात करण्यात आली आहे. त्यांना बोलताना त्रास होत असून घशामध्ये इन्फेक्शन झाले असल्याचे वैद्यकीय पथकाने माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

मराठा आरक्षणाचे आंदोलन मिठवण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भेटले होते. त्यावेळी त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र जरांगे-पाटील यांनी तुम्ही अध्यादेश काढल्यानंतरच मी आंदोलन मागे घेणार असं सांगितले. त्यावरून त्यांच्या चर्चा फिस्कटल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलन चालूच ठेवले आहे. त्यामुळे आता जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून वैद्यकीय पथकाकडून त्यांना सलाईन लावण्यात आली आहे.

हे ही वाचा >> “भाजपचा नवा सनातन धर्म, मोदी-शाह चिअर्स करणार का?”, शिवसेनेचा (UBT) थेट सवाल

बोलताना त्रास…

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. त्यांनी कालच सरकारने निर्णय दिला नाही तर पाण्याचाही त्याग करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र काल तोडगा काही निघाला नाही. त्यानंतर त्यांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. आता त्यांच्या घशात इन्फेक्शन झाले असून बीपी आणि शुगरचाही त्यांना त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर आता वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

अध्यादेश येत नाही तोपर्यंत…

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जरांगे पाटील यांनी सरकार जोपर्यंत अध्यादेश काढत नाही तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही असं स्पष्ट केले. त्यामुळे सरकार कोंडीत सापडले असून जरांगे पाटील यांची प्रकृतीही खालवली आहे.

अजून माघार नाही

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतरच मी आंदोलन मागे घेणार आहे. त्यामुळे आता हे मी शेटवचं लढतो आहे. यावेळी आरक्षण नाही मिळालं तर एक तर माझी अंत्ययात्रा निघेल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल असं जरांगे पाटील यांनी म्हटले होते. बाळांनो मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर समाजाचा, त्यामुळे मी असा मेलेला बरा असं त्यांनी सरकारला सांगितले आहे. जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा देत अजून माघार नाही असंही त्यांनी सरकारला सूचित केले आहे.

हे ही वाचा >> Rupal ogre :संबंधास नकार दिल्याने…, एअर होस्टेस हत्याकांडात मोठा खुलासा

नाही तर माझी अंत्ययात्रा…

जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारल्यापासून त्यांनी सरकारला अध्यादेश काढण्याची विनंती केली आहे. कालही त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळाला स्पष्ट शब्दात सांगितले की, आता जर आरक्षण मिळालं नाही तर एक तर माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची अंत्ययात्रा निघेल. त्यांच्या या भूमिकेमुळे आता सरकार नेमकं काय निर्णय घेणार त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

    follow whatsapp