Jitendra Awhad : गावात एकूण मतदार 396, पण मतदान झालं 624, इव्हीएममध्ये गडबड? गणित सांगत आव्हाडांचा सवाल

सुधीर काकडे

26 Nov 2024 (अपडेटेड: 26 Nov 2024, 04:01 PM)

Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भाने व्हायरल होणार्‍या मतांच्या एका गणितावरुन इव्हीएमवर निशाणा साधला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

कन्नड विधानसभेच्या मतमोजणीमध्ये काय झालं?

point

जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?

Jitendra Awhad on EVM : राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, महायुतीला राज्यात मोठं यश मिळालं आहे. राज्यात महायुतीचे तब्बल 233 आमदार निवडून आले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 46 आमदार निवडून आणता आले आहेत. या निकालानंतर विरोधकांकडून इव्हीएमवरुन गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक  नेत्यांनी इव्हीएमवर शंका घेत वेगवेगळ्या घटनांची दाखले दिले आहेत. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं एक व्टिट सध्या चांगलंच व्हायरल होतंय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Eknath Shinde : "माझ्या समर्थनार्थ कुणीही...", मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

जितेंद्र आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भाने व्हायरल होणार्‍या मतांच्या एका गणितावरुन इव्हीएमवर निशाणा साधला आहे. यामध्ये तळनेरा गावातील मतांचं चुकलेलं गणित दाखवण्यात आलं आहे. तळनेर गावात एकूण मतदार 396 आहे. पण प्रत्येक उमेदवाराला त्या गावात मिळालेल्या मतदानाची बेरीज ही तब्बल 624 एवढी भरतेय. तळनेर गावातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या उदयसिंह राजपूत यांना 194, शिंदेंकडून उभ्या असलेल्या संजना जाधव यांना 326 तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 104 मतं मिळाली आहेत. या तिघांच्याही मतांची बेरीज केल्यास ती तब्बल 624 होत असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे गावात फक्त 396 मतदार असताना 624 मतदान कसं झालं असा सवाल उपस्थित केला जातोय. या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, "EVM वर मुळीच शंका नाही, पण या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? लवकरच हे उघडकीस आणू!"
 

हे ही वाचा >> Maharashtra New CM News Live : एकनाथ शिंदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री, पुढचा मुख्यमंत्री कोण?


राज्यात अनेक ठिकाणी इव्हीएम मतमोजणीदरम्यान गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मनसे उमेदवाराकडूनही दहिसरमध्ये उमेदवाराला कुटुंबातल्या मतदारांपेक्षा मतं कमी पडल्यानं प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसंच काँग्रेस नेत्यांनीही याबद्दल सवाल उपस्थित करत इव्हीएम हॅकींगचे आरोप केले आहेत.

    follow whatsapp