Politics Of Maharashtra : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वर्ष होत नाही, तोच महाराष्ट्रात तशीच राजकीय परिस्थिती उद्भवली आहे. वर्षभरातच शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टात गेला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा वादही सुप्रीम कोर्टासमोर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंची बाजू कपिल सिब्बल यांनी मांडली होती. आता राष्ट्रवादीमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झालेली असताना सिब्बल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (senior lawyer kapil sibal made big statement on ajit pawar revolt)
ADVERTISEMENT
धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना पुन्हा मिळू शकतं, त्याचबरोबर अजित पवारांना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह मिळणार नसल्याचं सिब्बल यांनी म्हंटलं आहे.
राष्ट्रवादीतील बंडानंतर कपिल सिब्बल काय बोलले?
द वायर शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. कपिल सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देताना विधानसभेतील आणि संसदेतील सदस्यांच्या संख्येवरुन पक्ष कोणाचा हे ठरवले जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे. त्यासाठी संघटनेतील बहुमतही विचारात घेतलं पाहिजे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळू शकतं. त्याचप्रमाणे आमदारांच्या संख्येवरुन अजित पवारांना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह मिळणार नसल्याचं देखील सिब्बल यांनी म्हटलं आहे.
वाचा >> अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळेंचं वाढलं टेन्शन, ‘हे’ असेल मोठं आव्हान
सिब्बल यांच्या या दाव्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात. निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. पण, उद्धव ठाकरेंच्या पक्षाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. यावर एक सुनावणी झालेली असून, निवडणूक आयोगानेही त्याची बाजू स्पष्ट केली आहे. आता अजित पवार यांनी देखील आता पक्षाचं नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांना देखील निवडणूक आयोग नाव आणि चिन्ह देतं का हे पाहावं लागेल.
हे सगळं सत्तेच्या भाकरीसाठी -सिब्बल
सिब्बल यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर ट्विट करत संताप देखील व्यक्त केला आहे. सिब्बल त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाराष्ट्राचं राजकारण ही लोकशाही नाही, हा तमाशा आहे आणि असं दिसतंय कायद्याने याला परवानगी दिली आहे. हे सगळं लोकांसाठी नाही तर सत्तेच्या भाकरीसाठी सुरु आहे.’
वाचा >> NCP: अजितदादांचं बंड, पवारांसोबत सावली सारखे राहणाऱ्या रोहित पवारांची स्फोटक मुलाखत जशीच्या तशी!
दरम्यान गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक शरद पवारांनी दिल्लीत घेतली. यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर 9 आमदारांना पक्षातून बडतर्फ केलं आहे. त्यामुळे येत्या काळात काय राजकारण रंगतं हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
ADVERTISEMENT