Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिलांची प्रतिक्षा संपणार आहे. या बातमीने महिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. असे असले तरी महिलांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही डिसेंबरमध्ये बंद होणार असल्याचे अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. (ladki bahin yojana to be closed in december economist neeraj hatekar big statement mukhymantri ladki bahin yojana marathi news)
ADVERTISEMENT
लाडकी बहीण योजनेचा रिव्ह्यू सरकार डिसेंबरमध्ये घेणार आहे. थोडक्यात काय तर पात्र अपात्राचे निकष हे डिसेंबरपर्यंत लागू करणार आहे. त्यामुळे ही योजना डिसेंबरमध्ये लागू राहिल असे अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर यांनी म्हटलं आहे. तसेच डिसेंबरमध्ये खूप लोकांना अपात्र घोषित करण्यात येईल, असा दावा देखील हातेकर यांनी केला होता. बीबीसीशी बोलताना हातेकर यांनी हे विधान केले आहे. सरकारला अशा योजना सातत्याने चालवता येणार नाही. त्यामुळे नवीन सरकार आल्यानंतर या योजनेला बरीच कात्री लागली जाईल आणि हळूहळू ती बंद होईल, असे नीरज हातेकर यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा :Ladki Bahin Yojana : ...तर 4500 हातातून गमावून बसाल, 'ही' चूक आताच टाळा
'या' महिलांना 1500 मिळणार?
आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते. त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3000 रूपये जमा झाले होते. या योजनेत दरमहा 1500 रूपये दिले जातात. पण या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रूपये देण्यात आले होते. आता ऑगस्टपर्यंतचा निधी या महिलांना मिळाला होता. आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना आहे. त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये जमा होणार आहेत.
मग 3500 कुणाला मिळणार?
ज्या महिलांना 31 जुलैआधी अर्ज भरता आले नव्हते. तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते. अशा महिलांच्या खात्यात हे 4500 जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रूपया आला नाही आहे, अशा महिलांच्या खात्यात 4500 जमा होणार आहे.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांची लॉटरीच लागली, अर्जही मंजूर आणि 'इतके' पैसे मिळणार
दरम्यान लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रूपये जमा झाले आहेत. तर सुत्रानुसार निवडणुकीनंतर नवीन सरकार डिसेंबरपासून पैसे देण्यास सूरूवात करेल, अशी माहिती आहे.
ADVERTISEMENT