पुन्हा लॉकडाऊन? HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री, पाहा कुठे सापडले रुग्ण

HMPV Virus in Maharashtra: HMPV या व्हायरसने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. कारण या व्हायरसचे दोन रुग्ण हे नागपुरात आढळून आले आहेत.

HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री (फोटो सौजन्य: Getty Images)

HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री (फोटो सौजन्य: Getty Images)

रोहित गोळे

• 09:21 AM • 07 Jan 2025

follow google news

How Many HMPV Virus Cases in India: नागपूर:  HMPV म्हणजेच ह्युमन मेटान्यूमो व्हायरसची प्रकरणे भारतात वाढतच आहेत. ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, देशात आतापर्यंत 7 लोक या विषाणूचे बळी ठरले आहेत. दरम्यान, आता या व्हायरसने महाराष्ट्रातही धडक दिली आहे. या व्हायरसचे दोन रुग्ण हे नागपुरात आढळून आले आहेत. 

हे वाचलं का?

दरम्यान, आतापर्यंत तीन राज्यांमध्ये HMPV रुग्णांची पुष्टी झाली आहे. तथापि, केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, रुग्णांमध्ये वाढ झाली तरी कोविडसारखी परिस्थिती उद्भवणार नाही. 2001 मध्ये नेदरलँडमध्ये पहिल्यांदा हा विषाणू आढळला होता.

हे ही वाचा>> नव्या वर्षी कंबर हवी अशी सडपातळ? फक्त 3 टिप्स अन्...

रुग्ण कुठे सापडले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी भारतात HMPV च्या 7 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी बंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडू मध्ये प्रत्येकी 2 आणि अहमदाबादमध्ये 1 रुग्ण आढळून आला. ICMR ने बंगळुरू येथील बॅप्टिस्ट हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांची पुष्टी केली आहे. देशातील HMPV चा पहिला रुग्ण हा बंगळुरूमध्ये आढळून आला होता. 3 वर्षांच्या मुलीला डिसेंबरमध्ये ताप आणि थंडी वाजत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र, त्यातून ती पूर्णपणे बरी झाली असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हे ही वाचा>> HMPV ने लावली वाट, कोरोनासारखा नवा रोग?

दुसरा रुग्ण हा 3 जानेवारी रोजी आढळून आला, ज्यामध्ये 8 महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे. या दोन्ही मुलांना यापूर्वी ब्रॉन्कोन्यूमोनियाचा त्रास झाला होता आणि त्यांनी परदेशात प्रवास केला नव्हता. 24 डिसेंबर रोजी राजस्थानमधील डुंगरपूर येथील एका 2 वर्षाच्या मुलाला अहमदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 डिसेंबर रोजी त्याला HMPV झाल्याचं समोर आलं होतं. 

नागपूरमध्ये HMPV चे दोन रुग्ण सापडले

तर 3 जानेवारी रोजी नागपूरमध्ये 7 आणि 13 वर्षांच्या दोन मुलांना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्यांना HMPV ची लागण झाली आहे. विशेष म्हणजे नागपूर महापालिकेने या दोन्ही रुग्णांची एम्समध्ये पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दोन्ही मुले बरी असल्याचं समोर आलं आहे. 

काळजी करण्याची गरज नाही - सरकार

केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी सोमवारी सांगितले की, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि काळजी करण्याचे कारण नाही. ते म्हणाले की HMPV हा नवीन विषाणू नाही आणि देशात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणू रोगजनकात वाढ झालेली नाही. एका व्हिडिओ संदेशात नड्डा म्हणाले की, चीनमधील HMPV च्या अलीकडील बातम्या पाहता, आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, देशातील सर्वोच्च आरोग्य संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) चीन आणि इतर शेजारी देश येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

ते म्हणाले की, 'WHO ने परिस्थितीची दखल घेतली आहे आणि लवकरच अहवाल आमच्याशी शेअर केला जाईल. आयसीएमआर आणि इंटिग्रेटेड डिसीज सव्र्हेलन्स प्रोग्रामकडे उपलब्ध असलेल्या श्वसन विषाणूंबाबत देशातील डेटाचेही पुनरावलोकन केले गेले आहे आणि भारतात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणू रोगजनकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले नाही.'

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, 4 जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (DGHS) अध्यक्षतेखाली संयुक्त देखरेख बैठक झाली. ते म्हणाले, 'देशातील आरोग्य यंत्रणा आणि पाळत ठेवणारे नेटवर्क कोणत्याही उदयोन्मुख आरोग्य आव्हानाला तत्परतेने प्रतिसाद देण्यासाठी तयार राहतील. काळजी करण्याची गरज नाही, आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.'

    follow whatsapp