Security Breach in Parliament : संसदेवरील हल्ल्याच्या स्मृतिदिनीच संसदेच्या सुरक्षेला चकमा देत दोन जणांनी लोकसभेत घुसखोरी केली. प्रेक्षक गॅलरीतून खाली उड्या घेत दोघांनी लोकसभेत गोंधळ घातला. घुसखोरी करणाऱ्यांनी लोकसभेत अश्रुधुरांचे स्प्रे मारले. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. हा सगळा घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ADVERTISEMENT
अंगावर काटा आणणारी घटना लोकसभेत बुधवारी (13 डिसेंबर) घडली. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. त्यानंतर दोन्ही तरुण खासदार बसतात, त्या टेबलांवरून उड्या मारत पळायला लागले. त्याचवेळी एका तरुणाने बुटात लपवून आणलेला स्प्रे बाहेर काढला आणि सभागृहात फवारला.
दोन्ही तरुणांच्या हातात अश्रू गॅस कॅन होते, असे घटनेवेळी सभागृहात असलेल्या खासदारांनी सांगितले. दोन्ही तरुणी स्प्रे फवारत असताना आणि टेबलवरून उड्या मारत असताना काही खासदारांनी त्यांना पकडले आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं.
काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि त्यांनी काहीतरी फेकले. त्यातून गॅस बाहेर पडत होता. खासदारांनी त्यांना पकडले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. हे निश्चितपणे सुरक्षेत झालेली मोठी चूक आहे.
लोकसभेत घुसखोरी करणारे ते दोघे कोण?
ज्या दोन तरुणांनी लोकसभेत घुसून गोंधळ घातला आणि अश्रू गॅस फवारला. त्यापैकी एकाचे नाव सागर शर्मा आहे. हे दोन्ही तरुणी लोकसभा खासदाराच्या पासवर कामकाज पाहण्यासाठी आले होते. खासदार दानिश अली यांनी सांगितलं की, लोकसभेत गोंधळ करणारे तरुण खासदाराचा व्हिजिटर पास घेऊन आले होते. सागर शर्माबरोबरच लोकसभेत उडी मारणाऱ्या दुसऱ्या तरुणाचं नाव मनोरंज डी आहे. हा तरुण कर्नाटकातील म्हैसूरचा आहे. त्याचं व्य 35 वर्ष आहे. खासदाराचा पास असल्यामुळे ते प्रेक्षक गॅलरीपर्यंत पोहोचले होते.
ADVERTISEMENT