‘स्वाती’ बनली ‘शिवाय’… वाढवल्या दाढी-मिशा; लग्नासाठी घरचे शोधताहेत मुलगी!

रोहिणी ठोंबरे

• 03:47 AM • 01 Nov 2023

मध्य प्रदेशातील बैतूलमधून लिंग बदलाचे एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. जिथे व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलीवर शस्त्रक्रिया करून ती मुलगा झाली आहे.

Uttar Pradesh Gender Transformation Story She become Swati to Shivay now looking for a girl for marriage

Uttar Pradesh Gender Transformation Story She become Swati to Shivay now looking for a girl for marriage

follow google news

Gender Transformation Story : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूलमधून लिंग बदलाचे एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. जिथे व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या मुलीवर शस्त्रक्रिया करून ती मुलगा झाली आहे. तिने दाढी-मिशीही वाढवल्या आहेत आणि आता घरचेही तिच्या लग्नासाठी मुलीचं स्थळ शोधत आहेत. (Madhya Pradesh Gender Transformation Story She become Swati to Shivay now looking for a girl for marriage)

हे वाचलं का?

‘मला आतून मुलांच्या भावना होत्या’-शिवाय

संजय कॉलनीत राहणारा 30 वर्षीय शिवाय तीन वर्षांपूर्वीपर्यंत मुलगी होता आणि त्याचे नाव स्वाती होते. शिवाय म्हणतो, लहानपणापासूनच त्याला आतून मुलांच्या भावना होत्या.

वाचा : LPG Price Hike: दिवाळीआधीच झटका! LPG सिलिंडर महागला, किती वाढले दर?

सुरुवातीला त्याने आपले केस लहान केले आणि मुलांप्रमाणे खेळायला सुरुवात केली, परंतु काही काळानंतर घरातील लोकांना ते आवडले नाही. ‘मी स्वतः माझ्या स्त्री शरीरावर खूश नव्हतो.’ असं शिवायने सांगितले.

युट्यूबवरून शिवाय बनण्याची मिळाली प्रेरणा

शिवायने एकदा युट्यूबवर आर्यन पाशाला पाहिलं होतं. आर्यनने स्त्री शरीराचं पुरूषात ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं आणि नंतर तो बॉडीबिल्डर झाला. यानंतर त्यानेही मुलगा होण्याचा निर्णय घेतला आणि लिंग बदलून तो स्वातीचा ‘शिवाय’ झाला.

वाचा : मोठी बातमी.. राज्यात ‘एवढ्या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित, पाहा सरकारचा जीआर!

स्वातीपासून बनवलेला ‘शिवाय’

शिवाय सूर्यवंशी यांनी सांगितले की, लिंग बदल शस्त्रक्रियेमध्ये तीन टप्पे असतात. यानंतर, मुलाचे मुलीमध्ये आणि मुलीचे मुलामध्ये रूपांतर होऊ शकते. दिल्लीच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. 2020 मध्ये पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर तीन वर्षांत तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

शस्त्रक्रियेसाठी किती झाला खर्च?

शिवायने सांगितले की, या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च आला. तो म्हणतो की, त्याला खूप दिवसांपासून शस्त्रक्रिया करायची होती. परंतु, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते होऊ शकले नाही. आता आयुष्मान योजनेंतर्गत शस्त्रक्रियाही करता येणार आहे. आता शिवायला हवं ते शरीर मिळालं आहे असं वाटतं. आता मुलगी शोधून लवकरच लग्न करेन असं तो म्हणतो. त्याच्या कुटुंबातीलही सर्वजण आनंदी आहेत.

वाचा : Manoj Jarange: ‘भाजप विद्रूप करून टाकलाय…’, मनोज जरांगेंची थेट फडणवीसांवर जहरी टीका

‘मला दुसरा भाऊ मिळाला’- कृष्णा सूर्यवंशी

शिवायचा मोठा भाऊ कृष्णा सूर्यवंशी म्हणाला, ‘सुरुवातीला आमचा विरोध होता, पण नंतर संपूर्ण कुटुंबाने सपोर्ट केला. आता मला आणखी एक भाऊ मिळाला आहे. पूर्वी आम्ही पाच भावंडं होते. मी आणि 4 बहिणी होत्या. स्वाती ही सर्वात लहान बहीण होती. पण आता स्वाती शिवाय झाल्यामुळे आम्ही दोन भाऊ आणि तीन बहिणी असे आहेत.’

कुटुंबातील प्रत्येकजण खूप आनंदी…

यापूर्वी शिवायची कागदपत्रे स्वातीच्या नावावर होती, शस्त्रक्रियेनंतर त्याच्या सर्व कागदपत्रांमध्येही त्याचे नाव बदलण्यात आले आहे. शस्त्रक्रियेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनीही पत्र दिले होते. त्यांच्या मदतीने दस्तऐवजातील नाव बदलले आहे.

    follow whatsapp