Viral Video : रंगकाम करताना छातीत कळ आली अन्… 28 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद

रोहिणी ठोंबरे

29 Dec 2023 (अपडेटेड: 29 Dec 2023, 07:21 AM)

इंदूरच्या चंदन नगरमध्ये काम करत असताना एका 28 वर्षीय पेंटरचा अचानक जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

Madhya Pradesh News A 28 years old Painter Dies Suddenly due to heart attack

Madhya Pradesh News A 28 years old Painter Dies Suddenly due to heart attack

follow google news

Madhya Pradesh News : इंदूरच्या (Indore) चंदन नगरमध्ये (Chandan Nagar) काम करत असताना एका 28 वर्षीय रंगकाम करणाऱ्या व्यक्तीचा अचानक जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) जिल्हा रुग्णालयात पाठवला. (Madhya Pradesh News A 28 years old Painter Dies Suddenly due to heart attack)

हे वाचलं का?

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगकाम करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आशिष सिंग (Ashish Singh) असून तो 28 वर्षांचा होता. मृत आशिष दस्तूर गार्डनजवळ रंग कामाचं काम करत होता. यादरम्यान, अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं आणि तो खाली बसला. यानंतर अचानक तो जमिनीवर कोसळला.

वाचा : Madha Lok Sabha 2024 : धैर्यशील मोहिते पाटलांचा पत्ता कट, भाजपचा उमेदवार ठरला?

जवळच रंगकाम करत असलेला दुसरा मित्र आशिषला खासगी रूग्णालयात घेऊन गेला. त्यानंतर तिथून त्याला महाराजा यशवंतराव रूग्णालयात नेण्यात आले. मात्र. त्यापूर्वीच आशिषचा मृत्यू झाला होता. याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली. हा संपूर्ण प्रकार CCTV फूटेजमध्ये कैद झाला आहे.

डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, बऱ्याचदा हृदयविकाराच्या झटक्यामुळे (Cardiac Arrest) असं अनेकदा घडतं. अनेक रूग्णांना गॅस किंवा अॅसिडीटीच्या समस्यांमुळे हृदयविकाराचा झटका येतो. धूम्रपानामुळेही हा धोका अधिक वाढतो.

वाचा : ‘काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायचीय’, जागावाटपावर राऊतांनी स्पष्टच सांगितले

सध्या इंदूरमधील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत आशिषच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही गोळा केले आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

    follow whatsapp