धक्कादायक ! 7 महिन्यात 4 हजार 872 नवजात बालकं दगावली, दररोजचा आकडा तर…

मुंबई तक

• 11:13 AM • 20 Dec 2023

राज्यातील नवजात बालकांच्या आरोग्याच्या प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण आरोग्य मंत्र्यांकडून गेल्या 7 महिन्यातील नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण जाहीर केल्याने अनेक जणांना आता धक्का बसला आहे.

maharashtra 4872 newborns died 7 months 23 babies die every day government announced statistics

maharashtra 4872 newborns died 7 months 23 babies die every day government announced statistics

follow google news

Health Issue : हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर सरकारकडून आणि विरोधकांकडून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानेही (Health Department) अशाच धक्कादायक गोष्टींचा खुलासा केल्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी राज्यातील नवजात बालकांचा (newborn baby) झालेला मृत्यप्रकरणी आकडेवारी जाहीर केली आहे. तानाजी सावंत यांनी ही आकडेवारी जाहीर करताना सांगितले की, 4800 नवजात बालकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. भाजपचे आमदार (BJP MLA) सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही त्यांनी माहिती दिली.

हे वाचलं का?

दिवसाला 23 मृत्यू

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, या वर्षीतील एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यामध्ये 4872 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. ज्या नवजात बालकांचा मृत्यू झाला होता, त्यांचे वय जन्मापासून ते अगदी 28 दिवसापर्यंतच होते. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, राज्यात प्रत्येक दिवशी 23 नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा >> Mumbai Crime : मुंबईत 64 वर्षाच्या महिलेवर रात्रभर बलात्कार, नंतर नग्न अवस्थेतच…

राज्यातील 5 जिल्हे

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नवजात बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे, सोलापूर, अकोला आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. नवजात बालकांच्या मृत्यूचे कारण सांगताना तानाजी सावंत म्हणाले की, ज्या 4872 नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यामध्ये 16 टक्के म्हणजेच 795 नवजात बालकांचा मृत्यू हा त्यांना होणाऱ्या श्वसनाच्या त्रासामुळे होतो.

शासनाने दिल्या सोयी सुविधा

त्यांनी यावेळी हे ही सांगितले आहे की, नवजात बालकांवर उपचार करण्यासाठी 52 केंद्र चालू करण्यात आल्याचाही त्यांनी दावा केला आहे. त्यांनी यावेळी हे सांगितले की, ज्या नवजात बालकांचे आरोग्य चांगले नाही, त्यांना रुग्णालयात औषधे, वेगवेगळ्या तपासण्या आणि वाहतूक व्यवस्थेची सोय करुन देण्यात आली आहे.

शहरातही मृत्यूचे प्रमाण

देशातील नवजात बालकांचा मृत्यू होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. 2019 मध्ये प्रति 1000 नवजात बालकांमागे ही मृत्यूदर 22 होता ,तर 2020 मध्ये 1000 मागे 20 झाला. म्हणजेच भारतात 2019 मध्ये 1 हजार नवजात बालकांमागे 22 बालकांचा मृत्यू झाला होता तर 2020 मध्ये मात्र ही संख्या कमी होऊन 1 हजार मागे 20 बालकांचा मृत्यू झाला होता. यावेळी त्यांनी ग्रामीण आणि शहरी या भागातीलही आकडेवारी जाहीर करत सांगितले की, शहरात हजार नवजात बालकांच्या मागे 12 तर ग्रामीण परिसरात 23 नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले.

दर मिनिटाला एक मृत्यू

युनिसेफच्या अहवालानुसार सांगण्यात आले आहे की, जगात एका वर्षात जन्मलेल्या एकूण 25 दशलक्ष मुलांपैकी सुमारे 1 पंचमांश मुलं ही भारतात जन्म घेतात. तर यामधील एका बाळाचा दर मिनिटाला मृत्यू होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तर 1990 मध्ये जगातील नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये भारताचा एक तृतीयांश वाटा होता, परंतु आज ते एक चतुतार्थांपेक्षाही कमी आहे.

    follow whatsapp