Mumbai Hoarding Case: फडणवीसांची मोठी कारवाई, 'या' IPS अधिकाऱ्याला केलं निलंबित

मुंबई तक

• 12:19 AM • 26 Jun 2024

Mumbai Hoarding Collapse Case: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणी महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांना सरकारने निलंबित केले आहे.

फडणवीसांनी केली मोठी कारवाई

फडणवीसांनी केली मोठी कारवाई

follow google news

Ghatkopar Hoarding Collapse Case: दिपेश त्रिपाठी, मुंबई: महाराष्ट्र सरकारने एकाच वेळी दोन मोठ्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील होर्डिंगच्या घटनेप्रकरणी राज्य सरकारने महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांना निलंबित केले आहे.खालिद यांच्यावर कारवाई करण्यासोबतच राज्य सरकारने पुण्याच्या सह आयुक्तांची पुण्यातून थेट औरंगाबादमध्ये बदली करण्यात आली आहे. मात्र इथे त्यांना औरंगाबादचे आयुक्त म्हणून पाठविण्यात आलं आहे. (maharashtra government big action ips quaiser khalid suspended in ghatkopar hoarding accident)

हे वाचलं का?

नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील होर्डिंग प्रकरणातील आयपीएस कैसर खालिद यांना हटवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्याने 13 मे रोजी मुंबईतील होर्डिंगच्या घटनेला जबाबदार असलेल्या इगो मीडिया लिमिटेडने कैसर खालिदच्या पत्नीला मोठी रक्कम दिल्याचा दावा केला होता. यानंतर कैसर खालिद यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. 13 मे रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात अवैध होर्डिंग कोसळून 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 70 हून अधिक जण जखमी झाले होते. त्या दिवशी जोरदार वारा आणि धुळीच्या वादळात पेट्रोल पंपावर होर्डिंग पडले होते.

हे ही वाचा>> मुख्यमंत्र्यांच्या सूटमध्ये राहण्याची 'बॉलिवूड क्वीन'ची इच्छा, पण कंगनाचा भ्रमनिरास कोणी केला?

आयपीएस अधिकाऱ्याला का केलं निलंबित?

मुंबईतील घाटकोपर होर्डिंग घटनेच्या तपासात आयपीएस कैसर खालिद यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. सर्व निकषांकडे दुर्लक्ष करून त्यांनी 120X 140 चौरस फूट होर्डिंग बसविण्यास परवानगी दिली. मोहम्मद कैसर खालिद आता मुख्यालय मुंबई येथे अहवाल देतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. डीजीपीच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. घाटकोपरमध्ये ज्या जमिनीवर होर्डिंग लावले होते. ते सरकारी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात होते आणि पेट्रोल पंपाजवळ होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी तत्कालीन GRP आयुक्त कैसर खालिद यांच्या मान्यतेने मेसर्स इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला 10 वर्षांसाठी देण्यात आली होती. 

हे ही वाचा>> Loha Kandhar vidhan sabha : लोकसभेला पडले, चिखलीकरांसाठी विधानसभेची लढाईही कठीण?

होर्डिंग कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. कैसर खालिद हे 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ५२ वर्षीय खालिद हे मूळचे बिहारमधील अररिया जिल्ह्यातील आहे.

होर्डिंगचा पाया कमकुवत होता

वीरमाता जिजाबाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (व्हीजेटीआय) सादर केलेल्या अहवालात होर्डिंगचा पाया अपुरा आणि कमकुवत असल्याचे म्हटले आहे.व्हीजेटीआयच्या अहवालात असे म्हटले आहे की कोणत्याही होर्डिंगची रचना ताशी 158 किलोमीटरच्या वाऱ्याचा वेग सहन करण्यास सक्षम असावी,परंतु कोसळलेले होर्डिंग केवळ 49 किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग सहन करण्यास सक्षम होते.घटनेच्या दिवशी वाऱ्याचा वेग ताशी ८७ किलोमीटर होता, असे या अधिकाऱ्याने सांगितले होते. अपघातानंतर पोलिसांनी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक भावेश भिंडे यांना अटक केली होती.

    follow whatsapp