Weather in maharashtra tomorrow : राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, 28 जुलै रोजी मुंबई-पुणे या जिल्ह्यांसह राज्यातील इतर भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. 115 ते 204 मिमी पाऊस होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत जोर वाढणार (mumbai weather)
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबईत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता कमी आहे. कोकण किनारपट्टी भागात तुफान पाऊस होणार असल्याचा अंदाज असून, हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
वाचा >> Nilesh Lanke: ‘ती माझी बायको…’ गुंड गावात घुसल्यावर ‘तो’ आला गाडीसमोर, हा राजकीय ड्रामा अन्…
हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा दिला गेला असल्यामुळे मुंबईतील जिल्हा प्रशासन आणि मुंबई महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर असून, पाण्याचा निचरा करण्यासाठी, तसेच पावसाचा फटका बसलेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
पुण्याला झोडपणार (Pune Weather)
पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, पुढील 24 तासांत 204 मिमीपर्यंत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेला असल्याने पुणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाकडून नजर ठेवली जात आहे. पुण्यात शनिवारीही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
वाचा >> Raj-Uddhav: ठाकरे बंधू महाराष्ट्रात इतिहास घडवतील?, ‘ही’ चर्चा अन्…
28 जुलै : कुठे कसा असेल पाऊस
हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला असन, ऑरेंज अलर्ट दिला आहे.
वाचा >> Pune Crime : पत्नी-पुतण्याला का घातल्या गोळ्या? कारण येणार समोर, पोलिसांना तपासाचा मार्ग सापडला
दुसरीकडे पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलढाणा, वर्धा, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला गेला आहे. नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT