Maharashtra Weather Forecast : मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार!

मुंबई तक

10 Jul 2024 (अपडेटेड: 10 Jul 2024, 09:16 AM)

Weather Forecast Updates in Marathi : 10 जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल? मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कसे असेल हवामान?

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील हवामान अपडेट्स

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील हवामान अंदाज १० जुलै

point

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर हवामान अंदाज

point

हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra, Mumbai Weather Forecast Latest News : पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने १० जुलै रोजी महाराष्ट्रातील हवामान कसे असेल, याबद्दलचा अंदाज वर्तवला असून, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (The IMD has predicted heavy rain in many districts of Maharashtra including Mumbai, Pune, Nashik, Thane, Chhatrapati Sambhajinagar and Nagpur)

हे वाचलं का?

महाराष्ट्रात १० जुलै रोजी अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुणे,ठाणे,नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 

Weather Updates 10 July : या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल.

हेही वाचा >> पिता-पुत्राने ट्रेनसमोर उडी मारली अन्.. हादरवून टाकणारा VIDEO

नाशिक, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नंदूरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

10 जुलै रोजी महाराष्ट्र, मुंबई, पुण्यात कसे असेल हवामान, पहा नकाशा.

 

12 July Weather Update : पुण्यासह पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

11 जुलै रोजी पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, 12 जुलै रोजी पुण्यासह कोकणातील जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. १२ जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 

हेही वाचा >> वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत, पुण्यात शरद पवारांचं गणित बिघडणार?

12 जुलै रोजी महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Maharashtra Weather 13 July : पुण्यासह सहा जिल्ह्यांना इशारा

13 जुलै रोजी महाराष्ट्रातील रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असून, महाराष्ट्राच्या उर्वरित भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

    follow whatsapp