Maharashtra Weather Updates: दिवाळी आली तरी पावसाचं जायचं नाव नाही! आजही 'या' भागांना मुसळधार इशारा

रोहिणी ठोंबरे

25 Oct 2024 (अपडेटेड: 25 Oct 2024, 07:29 PM)

Maharashtra Weather Latest Update : दिवाळीचा सण काही दिवसांवर आलेला असताना राज्यात परतीच्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. आजही (25 ऑक्टोबर 2024) राज्यातील काही भागांत पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील 'या' भागात पावसाचा अंदाज!

point

मुंबईत कसं राहील हवामान?

Today Maharashtra Weather Update : दिवाळीचा सण काही दिवसांवर आलेला असताना राज्यात परतीच्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. आजही (25 ऑक्टोबर 2024) राज्यातील काही भागांत पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशावेळी तुमच्या शहरात वातावरण कसं असेल जाणून घेऊया... (maharashtra weather forecast rain alert to these districts IMD report today 25 october 2024)

हे वाचलं का?

राज्यातील 'या' भागात पावसाचा अंदाज!

पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील काही भागात पावसाची शक्यता आहे. पुण्यात आज तापमान 28 अंश कमाल तर 21अंश सेल्सिअस किमान असेल.

हेही वाचा : Love Relationship: 'माझं तुझ्यावर लय प्रेमंय...', असं प्रपोज मुलंच करतात, मुलीचं काय अडतं?

तर, सातारा जिल्ह्यातील काही भागात जोरदार वारे वाहतील. त्याचबरोबर विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येथे 26 अंश कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल.

मुंबईत कसं राहील हवामान?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मुंबईचे हवामान कोरडे आणि ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मुंबईत आता उकाडा जाणवत कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदवल्या जाण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp