Maharashtra Weather Todays Update : मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटा उसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगर प्रदेशात बुधवारी 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. तसच मुंबईतही कमाल तापमान 38 अंश सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं होतं. त्यामुळे मुंबई आणि परिसरात उकाडा वाढणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता.
ADVERTISEMENT
दरम्यान, आज 15 मार्च 2025 ला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने ट्वीटरवर दिली आहे. कोणत्या जिल्ह्यात कोरडं हवामान असेल आणि कोणत्या जिल्ह्यात उष्णता वाढणार आहे, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
राज्यात आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर धाराशिवमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Pune : स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा अंत, खेळायला सोडून गेले होते आजोबा...
तर अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्ध्यात उष्म आणि दमट हवामानाची परिस्थिती असेल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्येही कोरडं हवामान असेल, असं प्रादेशिक हवामान विभागाने ट्वीटरवर म्हटलंय.
फेब्रुवारी महिना संपताच राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढल्याचं समोर आलं. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा 41.2 अंशावर पोहोचला होता. त्यामुळे हवामान विभागाने मोठा इशारा दिला होता. ज्या ठिकाणी अति उष्णता असेल, त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, आजची हवामानाची परिस्थिती पाहता हवामान विभागाने कोणताही इशारा दिला नाहीय.
हे ही वाचा >> Pune : स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा अंत, खेळायला सोडून गेले होते आजोबा...
ADVERTISEMENT
