Maharashtra Weather: मुंबईत पावसाची दमदार हजेरी! 'या' जिल्ह्यांना IMD कडून रेड अलर्ट जारी

मुंबई तक

25 Aug 2024 (अपडेटेड: 25 Aug 2024, 10:31 AM)

Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत पावसाची दमदार हजेरी

point

मुंबईत हवामानाचा अंदाज काय?

point

'या' जिल्ह्यांना IMD कडून रेड अलर्ट जारी

Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यादरम्यान, हवामान विभागाने (IMD) आज (25 ऑगस्ट) काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. (maharashtra Weather update news IMD alert mumbai pune weather report today 25 august 2024 )

हे वाचलं का?

भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तर, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागांना रेड अलर्ट दिला आहे. तसेच, पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

मुंबईत हवामानाचा अंदाज काय?

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाच्या शक्यतेसह सामान्यतः ढगाळ आकाश. अधूनमधून 30-40 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 25°C च्या आसपास असेल.

'या' जिल्ह्यांना IMD चा महत्त्वाचा इशारा

पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे, रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा : Crime: महाराष्ट्रातील 'हे' शहर बनलंय जुगाऱ्यांचा अड्डा! पोलिसांनी आवळल्या ९ जणांच्या मुसक्या

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा इथे पावसाची शक्यता आहे.

 

    follow whatsapp