Manoj Jarange Patil Latest Updates : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीला मोठं यश मिळालं आहे. अंतरवाली सराटीतून मुंबईत उपोषणाला आलेल्या मनोज जरांगे यांच्या मागण्या शिंदे सरकारने मान्य केल्या आहेत. सगेसोयरे शब्दावरून पेच निर्माण झाला होता. त्यासंदर्भात राज्य सरकारने मध्यरात्रीच अध्यादेश काढला. त्याचबरोबर गुन्हे मागे घेण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अध्यादेश मिळताच मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे जरांगे गुलाल उधळत माघारी परत जाणार आहे.
ADVERTISEMENT
शिंदे सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन मनोज जरांगे यांना अध्यादेशाची प्रत त्याचबरोबर इतर मागण्यासंदर्भातील शासन निर्णयाच्या प्रती दिल्या. त्यानंतर मनोज जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. आमचे आंदोलन आता संपले आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मला त्यासंदर्भातील पत्र मिळाले असून, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन शनिवारी (२७ जानेवारी) उपोषण सोडणार आहे”, असे मनोज जरांगे पाटलांनी पहाटे तीन वाजेच्या सुमारास झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जरांगेंचा अल्टिमेटम… मध्यरात्री काय घडलं?
मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी १०.३० वाजता भेट घेतली होती. त्यानंतर दुपारी दोन वाजता मनोज जरांगेंची सभा झाली. या सभेत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे सगेसोयरे शब्दाची व्याख्या करणारा अध्यादेश काढावा आणि त्याची प्रत सकाळपर्यंत आणून द्यावी अन्यथा आझाद मैदानाकडे निघणार असा अल्टिमेटम दिला होता.
हेही वाचा >> Manoj जरांगेंच्या ‘त्या’ मागणीनंतर छगन भुजबळ आक्रमक, सरकारला थेट दिली धमकी!
रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने वर्षा बंगल्यावर अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत जरांगे यांच्या मागण्यांबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याच बैठकीत सगेसोयरे शब्दाची व्याख्या करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्याचा निर्णय झाला. यानुसार कुणबी दाखला असणाऱ्या व्यक्तीच्या सगेसोयरे व्यक्तींनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला.
हेही वाचा >> Shiv Sena UBT: ठाकरेंच्या Shiv Sena शहरप्रमुखाचा कोथळाच काढला, हत्येने खळबळ
या अध्यादेशाची प्रत घेऊन कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा यांच्यासह अधिकारी मनोज जरांगे यांच्या भेटीला रात्री वाशी येथे आले. तिथे त्यांनी जरांगे यांना अध्यादेशाची प्रत दिली. जरांगे पाटलांची आणि मंत्र्यांची चर्चा झाली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.
ADVERTISEMENT