मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढील मुख्यमंत्रिपदावरून बराच सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, बुधवारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपल्या बाजूने कोणताही अडथळा नसल्याचे सांगितले. भाजप जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी आणि शाह यांचेही कौतुक केले. 'मी कार्यकर्ता असून जो निर्णय घेतला जाईल त्याला पाठिंबा देऊ.' असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीबाबत बॅकफूटवर का आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT
शिंदे बॅकफूटवर का आले?
23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील मुख्यमंत्र्याबाबतच्या अटकळांना जोर आला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतच भाजपकडूनही मुख्यमंत्र्यांबाबत दावे केले जाऊ लागले. शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही आपापल्या विधीमंडळ पक्षाचा नेता निवडून दबावाचे राजकारण केले. मात्र आधी राष्ट्रवादी आणि आता शिवसेना बॅकफूटवर आली.
हे ही वाचा>> Eknath Shinde: CM पदावर पाणी सोडणाऱ्या शिंदेंना BJP देणार 'या' गोष्टी?, मुलाला उपमुख्यमंत्रिपद अन्...
वास्तविक 288 विधानसभेच्या जागांपैकी महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत, म्हणजे बहुमतापेक्षा केवळ 13 जागा त्यांना कमी आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, भाजपने एकट्याने 110 जागांचा टप्पा ओलांडला तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदावरील आपली पकड कमकुवत झाल्याचे जाणवू लागले.
मराठा फेस फॅक्टरही चालला नाही...
त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या मराठा चेहऱ्याबाबत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, पण भाजपने ज्या प्रकारे प्रत्येक विभागाची मते मिळवली, त्यावरूनही या फॅक्टरला छेद देण्याचे काम केले. 2019 आणि 2022 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री होण्यास मुकले होते.
हे ही वाचा>> Maharashtra New CM: महाराष्ट्रातील सत्तेचा नवा फॉर्म्युला आला समोर, पण मुख्यमंत्री...
शिवसेनेने आमदारांना समजावलं
एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांना समजावून आपापल्या मतदारसंघात जाण्यास सांगितल्याचे वृत्त समोर येत आहे, तर एकनाथ शिंदे यांनीही स्वत:ला महायुतीचा कार्यकर्ता असल्याचे जाहीर केले आहे. अशा स्थितीत आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी मिळू शकते, हे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा का दिला?
त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा का दिला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वास्तविक, राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम, या हालचालीमुळे ते शिवसेनेच्या बरोबरीने असतील. दुसरे म्हणजे, भाजपचे आकडे जास्त आहेत हेही त्यांना माहीत आहे. अशा स्थितीत त्यांना मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात 288 पैकी 230 जागा महायुतीला मिळाल्या होत्या.
ADVERTISEMENT