Maratha Reservation : 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा आरक्षणासाठी शपथ घेतली होती. त्याची परिपूर्ती करताना मला आनंद होते असल्याचे सांगत मराठा आरक्षणाचा (Reservation) एकमताने ठराव मंजूर केल्याचे सांगितले.' त्यांच्या मंजूर केलेल्या ठरावावर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
या मागणीसाठी उठावच नव्हता
मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले की, 'सगेसोयरे यांच्याबाबत जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती तेच सरकारने केले नाही. त्यामुळे ज्या मागणीसाठी उठावाच केला नाही त्या गोष्टी यांच्याकडून सांगितल्या जात आहेत' असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हे ही वाचा >> Maratha Reservation सुप्रीम कोर्टात टिकणार का? CM शिंदे म्हणाले, "आतापासून..."
आमचा अधिकार आम्हाला पाहिजे
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा ठराव मंजूर केला असला तरी आम्हाला सगेसोयरे यांचा अधिकार पाहिजे होता, आणि तो अधिकार पाहिजे म्हणजे पाहिजे अशा भाषेत त्यांनी ठणकावून सांगितले.
सरकारला आता गरज नाही
ओबीसीमधून आम्हाला आरक्षण मिळावे हीच आमची मागणी होती, आणि त्यावर अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. त्यासाठीच आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ दिला होता व त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र सगेसोयरे या बाबत जी मागणी केली होती, तिच सरकारने मागे ठेवली आहे. त्यामुळे त्यांना आता आमची गरज नसल्याचेच दिसून येतं असंही जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांविषयी टिप्पणी केली आहे.
उद्या महत्वाची बैठक
ज्या सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाबाबत आम्ही जी मागणी केली होती, तिच मागणी त्यांनी मागे ठेवली आहे. त्यामुळे आता आम्ही बुधवारी अंतरावाली सराटीत बैठक घेणार आणि पुन्हा आंदोलनाची दिशा ठरवणार पण शेवट काय आहे ते अजिबात सांगणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT