Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा ठणकावले, ’54 लाख मराठे ओबीसी…

मुंबई तक

• 04:30 PM • 21 Dec 2023

मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत समाजातील एकानेही आता नेत्याला आणि राजकीय पक्षाला मोठं मानायचं नाही. कारण त्यांच्यापेक्षा आता या क्षणी आपल्याला मराठा आरक्षण महत्वाचं असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

Manoj Jarange Patil said that 54 lakh Marathas are in OBC reservation

Manoj Jarange Patil said that 54 lakh Marathas are in OBC reservation

follow google news

Maratha Reservation : मराठा समाजाने आता आरक्षण (Reservation) मिळाल्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला आणि नेत्याला मोठं मानायचं नाही असा सल्ला आता मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या सभेत दिला. जरांगे पाटील यांची आज जालना जिल्ह्यातील बदनापूरमध्ये सभा झाली त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका करत मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. यावेळी सरकारला आम्ही वेळ दिला नाही तर त्यांनीच आमच्याकडून वेळ मागितला असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

मराठा समाजाची ताकद

मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या सभेतून 24 डिसेंबरची आठवण करून देत ही वेळ तुम्हीच मागून घेतली होती, त्यामुळे आता 24 तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार नाहीत त्यानंतरच तुम्हाला मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या प्रमाणे सरकारने 1967 च्या आधीच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत. त्याप्रमाणे सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> Rajouri Attack : राजौरीत लष्करी वाहनांवर दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद

सत्ता हातात आली म्हणून

मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या सभेतून सरकारवर आणि छगन भुजबळ यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. त्यांनी टीका करताना सरकारने आता मराठा समाजाला घाबरवण्याचं काम सोडून द्यावे. कारण अजून मुंबईला जाण्याचे निश्चित झाले नाही तरीही जर त्याआधीच नोटीस पाठवण्यात आल्या तर हे चुकीचे आहे. मराठा समाजाने खरेच ठरवले तर काय होईल त्याचा जरा विचार करा असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

स्वतःच्या पोरांसाठी आक्रोश

गेल्या काही दिवसांपासून चाललेला लढा हा मराठा समाजातील शाळेत जाणाऱ्यांसाठी आहे. कारण मराठा समाजाचे आरक्षणाचा लढा हा त्यांच्या स्वतःच्या पोरांसाठी आहे, म्हणून कित्येक दिवसांचा त्यांचा आक्रोश असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने ज्या प्रमाणे वेळ मागितला आहे, त्याप्रमाणे त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असंही त्यांनी सरकारला सांगितले.

मराठ्यांना हिसकावून घेण्यास…

तुम्ही त्याच्या नादाला लागून आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर टाकू नका म्हणत त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सांगितले मराठा आरक्षणाचा लढा हा गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही शांततेच्या मार्गाने करत आहोत, त्यामुळे आता सरकारने आमचा अंत्य पाहू नका. मराठा समाजाला आरक्षण हिसकावून घेण्यासही वेळ लागणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

    follow whatsapp