Manoj Jarange : ‘त्यांच्या मृतदेहांवर आरक्षणाचा आदेश ठेवणार का?’, ठाकरे सरकारवर कडाडले

उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून पुन्हा शिंदे सरकारवर तोफ डागली आहे. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. सरकारला जरांगे यांच्या प्राण वाचवायचे नाहीत, असेच दिसते, अशी शंका ठाकरेंनी घेतली आहे.

Uddhav Thackeray slaps shinde govt after manoj jarange resume hunger strike.

Uddhav Thackeray slaps shinde govt after manoj jarange resume hunger strike.

मुंबई तक

29 Oct 2023 (अपडेटेड: 29 Oct 2023, 11:08 AM)

follow google news

-दीपेश त्रिपाठी, मुंबई

हे वाचलं का?

Uddhav Thackeray on Manoj Jarange hunger Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या रविवारी (29 ऑक्टोबर) पाचवा दिवस आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला सुनावलं आहे.

मनोज जरांग पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ४० दिवसांचा वेळ दिला होता. मात्र, वेळ दिल्यानंतरही सरकारकडून कोणताही निर्णय घेतला न गेल्याने मनोज जरांगे यांनी २५ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण सुरू केले. अन्न-पाणी बंद केले असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीवरून आता उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावलं आहे.

हे ही वाचा >> मराठा आरक्षणावर 50 टक्क्यांची मर्यादा आली कारण…, सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

मराठा आरक्षण : उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका

उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की, “मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल, तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवेत. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे.”

समजून घ्या >> Maratha Reservation देणे खरंच शक्य आहे का?

“जरांगे पाटील उपोषण करीत आहेत, पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार ‘मन की बात’ करत आहे, पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे.

    follow whatsapp