Manoj Jarange : 'तुम्ही असले चाळे बंद करा', जरांगेंनी फडणवीसांना पुन्हा ललकारलं

मुंबई तक

28 Feb 2024 (अपडेटेड: 28 Feb 2024, 11:37 AM)

Manoj Jarange Patil Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांना डिवचलं आहे.

Manoj jarange warned devendra fadnavis

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे फडणवीसांविरुद्ध आक्रमक

point

मराठा समाजाला मनोज जरांगे यांचं आवाहन

point

मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापणार

Manoj Jarange patil Devendra Fadnavis : (इसरार चिश्ती, छत्रपती संभाजीनगर) राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता जरांगे पाटील आणखी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. 'असले चाळे बंद करा', असे म्हणत जरांगेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांना ललकारलं आहे. (Manoj Jarange again targets to devendra fadnavis)

हे वाचलं का?

छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील हे उपचार घेत आहेत. दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण आपल्या मागणीवर ठाम असल्याचे सरकारला सांगितले. 

मनोज जरांगे फडणवीसांना काय म्हणाले?

ते म्हणाले, "अटक होऊद्या अथवा चौकशी, ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहे. सरकारला आणि विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणं आहे की, असले चाळे तुम्ही बंद करा. मंडप काढून फेकेन. तिथे काही खून झाले नाहीत. तिथे काही दहशतवाद्याचे केंद्र नाहीये. संचारबंदी लावायला तिथ काही कापाकापी झालेली नाहीये. तिथे साखळी उपोषण सध्या सुरू आहे. गावावर दडपशाही चालू आहे, ती बंद करा."

मराठा समाजाला जरांगेंचं नवं आवाहन

पुढे मनोज जरांगे म्हणाले की, "आजपासून करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना ईमेल करणं सुरू करा. अंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगेसोयरे ची अंमलबजावणी करा, असे ईमेल करणं सगळ्यांनी सुरू करा आजपासूनच", असे आवाहन त्यांनी केले.  

हेही वाचा >> 'शिंदे-फडवणवीसांचे आरोप पोरकट', जरांगेंवरील 'त्या' आरोपांवर शरद पवारांचे उत्तर

"त्यांचं म्हणणं आहे की १० टक्के आरक्षण घ्यावं, नसता याला गुतवायचं. मी भीत नाही. मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, हा माझा मराठ्यांना शब्द आहे.

जेलमध्ये टाकलं तरी मागे हटणार नाही -जरांगे पाटील

जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, "जेलमध्ये टाकून सडवलं, तरी मी हटत नाही. मला अटक केलं, तरी तिथे माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. मग ते जेल असो, पोलीस स्टेशन असो की रुग्णालय. कुठेही असो. मी तडफडून तडफडून मरायला तयार आहे. पण, हटायला तयार नाही", असा इशारा जरांगे यांनी शिंदे सरकारला दिला.

हेही वाचा >> बंडखोर आमदारांचा काँग्रेसला धक्का! हिमाचलमध्ये गेम 

पुढे जरांगे म्हणाले, "सहा महिन्यांपासून सरकार सगेसोयरेची अंमलबजावणी करेल म्हणतंय, पण करत नाहीये. अंतरवालीसह महाराष्ट्रातील गुन्हे मागे घेईल म्हणतंय ते घेत नाही. हैदराबाद संस्थानचं गॅझेट, बॉम्बे गॅझेट, सातारा संस्थानचं गॅझेट घेऊ म्हणतात पण घेत नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना सरकारने प्रमाणपत्र वाटणं एक महिन्यापासून बंद केलं आहे. सरकार जाणून बुजून करत नाहीये", असे जरांगे यांनी सांगितलं. 

    follow whatsapp