Pooja Khedkar Mother: घरगुती लॉजिंगमध्ये लपलेली मनोरमा खेडकर, अटकेची Inside Story

मुंबई तक

18 Jul 2024 (अपडेटेड: 18 Jul 2024, 04:19 PM)

Manorama Khedkar Arrested : मनोरमा खेडकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होत्या. अखेर आज रायगडमधून त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान पोलिसांनी नेमका त्यांचा कसा शोध घेतला हे जाणून घेऊयात.

manorama khedkar arrested in raigad mahad parvati nivas hotel pune rural police pooja khedkar ias trainy

मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या.

follow google news

बातम्या हायलाइट

point

मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

point

शेतकऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

point

रायगडमधून मनोरमा खेडकर यांना अटक

Manorama Khedkar Arrested : ओंकार वाबळे, पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावताना दिसल्या होत्या. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होत्या. अखेर आज रायगडमधून (Raigad) त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान पोलिसांनी नेमका त्यांचा कसा शोध घेतला हे जाणून घेऊयात. (manorama khedkar arrested in raigad mahad parvati nivas hotel pune rural police pooja khedkar ias trainee)

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकर यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामध्ये मनोरमा खेडकर बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्याला धमकावताना दिसल्या होत्या. या प्रकरणी शेतकऱ्याने देखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या. पोलीस त्यांच्या मागावर होती, मात्र त्याचा शोध लागत नव्हता. 

हे ही वाचा : Ladka Bhau Yojana: तुम्हाला माहितीए 'माझा लाडका भाऊ' योजनेचं खरं नाव काय?

मनोरमा खेडकर यांच्या व्हायरल व्हिडिओचे प्रकरण तापताच त्या बेपत्ता झाल्या होत्या. रायगडमधील पार्वती निवास या हॉटेलमध्ये जाऊन त्या लपल्या होत्या. या दरम्यान पोलिसांना चकमा देण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये इंदुबाईच्या नावाने रूम बुक केला होता. जेणेकरून पोलिसांना त्यांचा सुगावा लागणार नाही. 

या प्रकरणी पार्वती निवास हॉटेलचे मालक अनंत औकीरकर म्हणाले की, मनोरमा खेडकर यांनी नाव बदलून हॉटेलमध्ये रूम घेतला होता. बुधवारी रात्री 9.30 ते 10 च्या सुमारास दोन जण आले होते. या दोघांनी आपलं नातं आई आणि मुलाचं असल्याचं सांगितलं होतं.  दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे व आईच नाव इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे असे नावाने त्यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केले होते. यानंतर मध्यरात्री 2 वाजता पोलीस येऊन गेले होते. संबंधित व्यक्तीची पडताळणी केल्यानंतर सकाळी 6 वाजता हॉटेलमधून येऊन त्यांना ताब्यात घेतले होते.

हे ही वाचा :  Opinion Poll : देवेंद्र फडणवीसांना बसणार जबर झटका? 'त्या' सर्व्हेत काय?

पोलिसांना त्यांच्या खास सुत्रांकडून मनोरमा खेडकर यांची माहिती मिळाली होती. त्यानुसार रात्री 2 वाजताच पोलिसांनी पार्वती निवास गाठले होते. यावेळी हॉटेल मालकाकडून पोलिसांनी मनोरमा खेडकर यांची चौकशी केली होती. त्यामुळे इंदुबाई नावाने मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपल्याची पोलिसांनी पुष्टी झाली. त्यानंतर सकाळी 6 वाजताच्या दरम्यान पोलिसांनी हॉटेल गाठून मनोरमा खेडकर यांनी अटक केली. 

दरम्यान गेल्या आठवड्यात 12 जूलैला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज स्थानिक गुन्हे शाखेने महाड मधील हिरकणीवाडी मधील एका हॉटेल मधून मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं आहे. मनोरमा खेडकर यांना आज कोर्टासमोर हजर केलं जाणार, अशी माहिती पुण्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली. 

    follow whatsapp