Ajay bawasakar maharaj vs Manoj jarange patil, Maratha reservation : मराठा कार्यकर्ते अजय बारसकर महाराज यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटलांवर खळबळजनक आरोप केले आहेत. बारसकर महाराज यांनी यावेळी जरांगेंच्या अनेक ऑडिओक्लिप ऐकवून त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबत बारसकर महाराजांनी जरांगेंवर वैयक्तिक आरोपही केले आहेत.. (maratha reservation ajay bawasakar maharaj allegation on manoj jarange patil maratha arkshan demand cm ekanath shinde antarawali sarati protest)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे यानी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अपमान केला आणि माफी मागितली. .ती माफीसुद्दा अहंकारमिश्रीत होती,अशी टीका अजय बारसकर महाराज यांनी केली. माझ्याकडे 300 कोटीची संपत्ती आहे, सरकारकडून मी 40 लाख घेतल्याचा आरोप जरांगेंनी केला होता. पण माझ्याकड़े 300 कोटी असते तर मी सरकारकडून 40 लाख घेतलेच का असते, असे बारसकर महाराज यांनी सांगितले आहेत.
दरम्यान जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी माफी मागितल्याची एक ऑडिओक्लिप देखील बारसकर आमहाराज यांनी ऐकवली. या ऑडिओक्लिपमध्ये कार्यकर्ते म्हणतात, आम्ही तुमची माफी मागतो. आंदोलनाला दिशा देण्याची गरज आहे. हा फोन डॉ. तारक, श्रीराम आणि संजू भाऊ यांनी केला होता,असे बारसकर यांनी सांगितले.
हे ही वाचा : Nanded : अशोक चव्हाणांनी काँग्रेसला दिला मोठा हादरा
लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यात काय चर्चा झाली. तुमची काय डिल झाली?आणि वाशीत तुम्ही 36 तास का थांबलात? असे अनेक सवाल बावसकरांनी जरांगेंना केले आहेत. तसेच अंतरावली सराटीत जेव्हा तुम्ही आंदोलन करत होतात, तेव्हा तुम्ही सरसकट आरक्षणाची मागणी केली होती. हीच मागणी वाशीत आल्यावर सगेसोयरे कशी झाली? असा सवाल देखील बारसकर महाराजांनी केला.
मराठा आरक्षणासाठी 45 तरूणांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबियांना निधी आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी केली होती. यातला निधी मिळाला मग सरकारी नोकरी देण्याची ही मागणी कुठे गेली? तसेच तुमच्या पाहुण्याचा दारात टीपर, वाळू काढण्याचे लोडर कसे आले, असे अनेक सवाल बावसकर महाराजांनी उपस्थित केले आहेत.
बावसकर महाराज यांनी जरांगेवर वैयक्तिक हल्ला देखील केला. 'मागच्या 17 दिवसापासून आंदोलन करत होता, तेव्हा रात्री कुणाच्या घरात जाऊन दुध भात खात होता, कोणत्या माय माऊलीकडून तू कमरेपर्यंत पाय दाबून घेतलेस. कोणत्या माता माऊलीला तू अंबडच्या आमदार बनवण्याचे आश्वासन दिले,असे आरोप बावसकर महाराज यांनी जरांगेंवर केले आहेत.
हे ही वाचा : Raj Thackeray : 'शरद पवारांना आज रायगड आठवला'
दरम्यान ;संभाजी राजेंच्या नावाने पैसै खाल्लेस, तुझ्यावर पुण्याच्या कोर्टात गुन्हा दाखल केला, सगळे पुरावे कोर्टात दाखल करेन. जा कोर्टात माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन', असे चॅलेजही बावसकर महाराजांनी दिले. मी नार्को, ब्रेन मॅपिंग, लाय डिटेक्टरला जायला तयार असल्याचे बावसकर महाराजांनी सांगितले.
बासरकर महाराजांच्या आरोपांना जरांगेंचे उत्तर
मनोज जरांगेंच्या कार्यकत्यांनी फोन करून माफी मागितल्याची ऑडिओक्लिप बासरकर महाराजांनी पत्रकार परिषदेत ऐकवली होती. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, 'मला माहित नाही ती कशासाठी मागितली काय ती'..'कोअर कमीटी काही नाही इथे. मला समाज महत्वाचा आहे, मी प्रत्येकाला उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर देईन, असे जरांगेंनी बारसकर महाराज यांना प्रत्युत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT