Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी गेल्या अकरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या चाललेल्या आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्राचा (Kunbi certificate) अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी काढला. त्यानंतर आंदोलनाला यश मिळाले असल्याचे बोलले जात असतानाच जरांगे पाटील यांनी त्यामध्ये काही बदल सुचवले होते. त्या बदलाबाबत चर्चा करण्यासाठीच सरकारच्यावतीने अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून जरांगे पाटील यांनीही ते निमंत्रण स्वीकारले होते. त्यामुळे आज जरांगे पाटील यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या भेटीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
ओबीसी समाजाचा आक्षेप
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने निजामकालीन ज्यांच्याकडे नोंदी असणार आहेत. त्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. मात्र त्यानंतर मराठा आरक्षण आणि ओबीस समाजाने त्यावर आक्षेप नोंदवल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले.
हे ही वाचा >> एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन अर्जून खोतकर मनोज जरांगे पाटलांना भेटले, काय झाली चर्चा?
छगन भुजबळ काय म्हणाले
त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार, नाना पटोले यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य असल्याचे सांगत त्यांच्या भूमिकेचे छगन भुजबळ यांनी समर्थन केले होते. त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामध्ये काही बदल सुचवले आहेत. त्यामुळे आज जरांगे पाटील यांचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे बोलले जात आहे.
तोपर्यंत आंदोलन सुरु
शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अध्यादेश काढून निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही मनोज जरांगे-पाटील यांनी आपले उपोषण सुरु ठेवून अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. सरकारने घेतलेल्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील यांनी आता बदल सुचवले आहेत. त्यामुळेच आज जरांगे पाटील यांचे एक शिष्टमंडळ सरकारला भेटणार आहेत.
सरकारने सुधारणा करावी
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो मात्र या निर्णयाचा आम्हाला काहीही फायदा होणार नाही. सरकारची आम्ही अडवणूक करत नाही. कारण सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे, फक्त त्यामध्ये थोडी सुधारणा करावी. ज्या ठिकाणी वंशावळी ज्यांच्याकडे असतील, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, त्या दोन शब्दांच्या जागेवर सरकारने सुधारणा करावी.
हे ही वाचा >> Sudhir More : ‘माझ्याशी संबंध ठेव नाहीतर…’; आत्महत्येपूर्वी महिलेचे 56 कॉल, आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण
…तरच आंदोलन मागे घेऊ
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. या प्रकारचा अध्यादेश आमच्याकडे आल्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी घेतली आहे. यामुळे आता सरकार आता भूमिका काय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT