Microsoft Server: मुंबई: जगभरातील बऱ्याच लोकांना त्यांच्या विंडोज सिस्टमवर निळ्या स्क्रीनची समस्या भेडसावत आहे. मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर बंद झाल्यामुळे जगभरातील बँकांपासून एअरलाइन्सपर्यंतच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे जगभरात गोंधळ माजला आहे. कंपनीच्या फॉर्मवरील पिन संदेशानुसार, अनेक विंडोज यूजर्संना ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (BSOD)त्रुटी दिसत आहे. (microsoft cloud outage microsoft servers down worldwide confusion banks and airline flights disrupted across the world)
ADVERTISEMENT
अलीकडेच करण्यात आलेल्या क्राउड स्क्रीम अपडेटनंतर ही समस्या येत आहे. या समस्येने मोठ्या प्रमाणात लोक त्रस्त झाले आहेत. मायक्रोसॉफ्टने ही माहिती दिली आहे. शुक्रवारी सकाळी त्यांची क्लाउड सेवा विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत.
हे ही वाचा>> Ladka Bhau Yojana GR: लाडका भाऊ योजनेचा जीआर लागू, पाहा तरुणांना नेमके कसे मिळणार पैसे?
त्यामुळे विमान कंपन्यांच्या उड्डाणांवर देखील परिणाम झाला आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांतील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
Microsoft मध्ये का आली एवढी मोठी अडचण?
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हिस हेल्थ स्टेटस अपडेटनुसार, या समस्येचे प्रारंभिक कारण Azure बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये करण्यात आलेला बदल आहे. ज्यामुळे स्टोरेज आणि कम्प्युटर रिसोर्सेस यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत आणि परिणामी कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण होते आहे.
या समस्येमुळे मायक्रोसॉफ्ट 365 सेवा प्रभावित झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मायक्रोसॉफ्टसोबत काम करणाऱ्या CrowdStrike ने ही समस्या मान्य केली आहे. CrowdStrike ही एक सायबर सुरक्षा फर्म आहे. या फर्मच्या अभियंत्यांनी समस्या निर्माण करणारी सामग्री शोधून काढली आहे आणि केलेले बदल हे दुरुस्त करून त्यांना पूर्ववत केलं आहे.
हे ही वाचा>> Maza Ladka Bhau Yojana Online Apply: असा भरा ऑनलाइन अर्ज, सरकारकडून मिळवा 10 हजार रुपये!
CrowdScream ने ही समस्या मान्य केली आहे आणि या बगचं नेमकं कारण काय हे ते शोधून काढत आहेत. CrowdStrike ने याबद्दल लिहिले आहे की, 'आम्हाला या त्रुटीची जाणीव आहे, जी विंडोज सिस्टममध्ये दिसत आहे.'
अनेक युजर्स याबाबत तक्रार करत आहेत. या समस्येमुळे लाखो यूजर्सवर मोठा परिणाम झाला आहे. बरेच यूजर्स हे तक्रार करत आहेत की त्यांची सिस्टम एकतर बंद झाली आहे किंवा त्यांना ब्लू स्क्रीन समस्येचा सामना करावा लागत आहे. मोठ्या बँका, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, जीमेल, ॲमेझॉन आणि इतर आपत्कालीन सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे.
ADVERTISEMENT