Nitesh Rane Statement : वेगवेगळ्या मुद्द्यांवरील भूमिकांमुळे चर्चेत राहणारे आमदार नितेश राणे यांनी एक विधान केलं आहे. पोलिसांसमोर सांगतो. माझं काही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर (देवेंद्र फडणवीस) बसला आहे, असे चिथावणीखोर विधान नितेश राणे यांनी केले.
ADVERTISEMENT
माळशिरसमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये बोलताना नितेश राणे यांनी प्रक्षोभक भाषण केले.
नितेश राणे भाषणात काय बोलले?
आमदार राणे म्हणाले, “नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलीस मागे लागले आहेत, वाचवा. झाल्यानंतर फोन करा. विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरुप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला देतो.”
हेही वाचा >> “ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांनाच OBC आरक्षण”, CM शिंदे स्पष्टच बोलले
याच मुद्द्याला धरून नितेश राणे पुढे म्हणाले,”पोलिसांच्या समोर देतो. माझं काही वाकडं करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर. काही होत नाही आम्हा लोकांना. आम्ही असंच बोलतो. कारण आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभे राहण्यासाठी आलो आहे. कुणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही.”
हेही वाचा >> जरांगे-पाटलांची पहिली मोठी घोषणा, ‘नोंदींच्या आधारे एक तरी…’
“या जिहाद्यांना… हे जे हिरवे वळवळताहेत ना, त्यांना सांगतो. जागेवरच रहा. जेवढे आहात तेवढेच रहा. उगाच आमच्या अंगावर आलात, ना तर उरले सुरले कसे साफ करायचे हे देखील आमच्या धर्माने आम्हाला दाखवून दिले आहे. जाता जाता एवढेच सांगतो की, किती हवा भरायची याला मर्यादा आहे. यानंतर हवा भरण्याची गरज पडली नाही पाहिजे”, असे नितेश राणे सभेत म्हणाले.
हेही वाचा >> “दिशाभूल करू नका”, सदावर्ते जरांगेंवर भडकले; सगेसोयरेचा घोळ काय?
“यापुढे कुठलंही अतिक्रमण झालं, तर आपला काय नारा असला पाहिजे. त्यांचा अली आणि आपला बजरंग बली. यापुढे हिंदू म्हणून कुणीही अधिकारी आपल्या कुणाकडे वाकड्या नजरेनं बघत असेल, तर कानाखाली 12 वाजवल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आम्ही सगळे आणि सरकार तुमच्या बरोबर आहे”, असे आमदार नितेश राणे म्हणाले.
ADVERTISEMENT