P N Patil : पी.एन.पाटलांच्या निधनानंतर लाडक्या 'ब्रुनो'नेही सोडला जीव

मुंबई तक

• 10:26 PM • 29 May 2024

P N Patil Dog Death : पी.एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून ब्रुनोने काहीच खाल्लं नव्हतं. त्यात 23 मे रोजी उपचारा दरम्यान पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला होता. या निधनानंतर पाटील यांच्या ब्रुनोने देखील जीव सोडला आहे.

mla p n patil death his beloved bruno dog also dies kolhapur news

पी एन पाटील यांच्या लाडक्या श्वानाने देखील प्राण सोडले होते.

follow google news

P N Patil Dog Death  : काँग्रेसच्या विचारधारेशी निष्ठा ठेवून राजकारण करणारे आमदार पी.एन. पाटील (P N Patil) यांचे 23 मे रोजी वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले होते. 19 मे रोजी राहत्या घरी बाथरूममध्ये ब्रश करत असताना पाय घसरून पडल्याने त्यांच्या मेंदूला रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत माळवली होती. पाटील यांच्या निधनाने कुटुंबियांसह काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला होता.आता याच धक्क्यातून पाटील यांच्या लाडक्या श्वानाने देखील प्राण सोडले आहे.  (mla p n patil death his beloved bruno dog also dies kolhapur news)  
  
पी. एन. पाटील यांच्या घरी ब्रुनो नावाचा एक पाळीव कुत्रा होता. गेल्या 9 वर्षापासून ब्रुनो पाटील यांच्या घरचा सोबती होता. मात्र जेव्हापासून पी.एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून ब्रुनोने काहीच खाल्लं नव्हतं. त्यात 23 मे रोजी उपचारा दरम्यान पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला होता. या निधनानंतर पाटील यांच्या ब्रुनोने देखील जीव सोडला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : महाराष्ट्रात 2019 च्या लोकसभेचा एक्झिट पोल किती अचूक ठरला?

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभेचे आमदार पी.एन. पाटील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गेल्या काही महिन्यापासून सतत फिरतीवर होते. मतदान पार पडल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला होता. दरम्यान रविवारी म्हणजे19 मे रोजी ते घरी होते. सकाळी साडे आठ वाजता ब्रश करत असताना ते खाली पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एमआरआय करण्यात आले. त्यात पाटील यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे आढळून आले.

त्यानंतर पाटील यांना तातडीने आधार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही करण्यात आली. मात्र, मेंदूची सूज कायम होती. त्यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते, पण गुरूवारी (21 मे) पहाटे 6 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील यांच्या निधनाने काँग्रेसची मोठी हानी झाली आहे. 

    follow whatsapp