राडा करणाऱ्यांना तोडल्याशिवाय राहणार नाही, माझा हिशोब…: आमदार संजय गायकवाड

Buldhana: बुलढाण्यातील एका राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी उघडउघडपणे धमकी दिल्याचं आता समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.

mla sanjay gaikwad is very aggressive against those who molest a minor girl and beat the youth in buldhana

mla sanjay gaikwad is very aggressive against those who molest a minor girl and beat the youth in buldhana

मुंबई तक

• 01:04 PM • 14 Nov 2023

follow google news

Buldhana MLA Sanjay Gaikwad: जका खान, बुलढाणा: बुलढाण्यातील मेहकर शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने धार्मिक कारणावरून राडा केला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली. तिच्या बचावासाठी आलेल्यांना देखील लाठीकाठी आणि दगडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. यावेळी घरात घुसून सामानाची तोडफोड केली. (mla sanjay gaikwad is very aggressive against those who molest a minor girl and beat the youth in buldhana)

हे वाचलं का?

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे शेकडो कार्यकर्ते घेऊन मेहकरमध्ये पोहचले. यावेळी आमदार गायकवाड हे फारच आक्रमक झाल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, ‘पोलिसांनी गुंडांवर गुन्हे दाखल केले असले तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांची जमानत झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही.’ असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मेहकर शहरातील मोळा रोडवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी 43 वर्षीय नेहाताई काटकर यांच्या तक्रारीवरून 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार नेहाताई काटकर ह्या आमदार संजय गायकवाड यांच्या भाची आहेत.

हे ही वाचा>> भयंकर! 6 वर्षांच्या चिमुकल्याचं लिफ्टमध्ये अडकलं मुंडकं अन् सणासुदीला घडला अनर्थ!

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या गल्लीतील महिलांसह मंदिरात दर्शनासाठी जात असताना 20 ते 25 जणांच्या टोळके हातात लाठ्या-काठ्या घेऊन महिलांना आडवे आले. त्यातील 15 वर्षीय मुलीसमोर फटाका फोडला. तसेच अश्लील हावभाव करून त्यांनी मुलीची छेड काढली. यावेळी काटकर यांच्या अंगावरील 1 तोळा सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले.

यावेळी तक्रारदार काटकर यांनी मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा त्यांचा मुलगा आणि त्याचे मित्र धावत त्या ठिकाणी आले. यावेळी टोळक्याने त्या दोघांनाही बेदम मारहाण केली. यावेळी काटकर त्यांच्या घरात गेल्या असता गुंडांनी घरात घुसून सामानाची नासधूस आणि तोडफोड केली. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा>> Rohit Pawar : “फडणवीस नेत्यांना पुढे करून वाद…”, पवारांच्या विधानाने खळबळ

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसह मेहकरात पोहचले. यावेळी घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. “हा वाद धार्मिक कारणावरून आहे, मंदिरात आरती का लावता? छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस का ठेवता” असल्या कारणांमुळे वाद झाल्याचे आमदार गायकवाड म्हणाले.

‘आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.. काल जर दिवाळी नसती तर एकेकाचे तुकडे केले असते. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी माझा हिशोब बाकी आहे.. त्यांची जमानत झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही..” असे आमदार संजय गायकवाड म्हणाले..

    follow whatsapp