Mohan Bhagwat Vijayadashami Speech : विजयादशमी निमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात शस्त्र पूजन कार्यक्रमा झाला. स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्द्यांवर विचार मांडले. मुंबईत गुजराती व्यक्तीने मराठी महिलेला घर नाकारल्याचा उल्लेख न करता सरसंघचालकांनी यावरही भाष्य केलं.
ADVERTISEMENT
सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?
रेशीम बागेतील संघ मुख्यालयात बोलताना सरसंघचालक भागवत म्हणाले, “जुन्या संघर्षांच्या कटु आठवणी अजूनही समाज मनात आहेत. फाळणीचा घाव खोलवर झालेला आहे. त्यावरून क्रिया-प्रतिक्रिया उमटते आणि त्यामुळे क्षोभ मनात निर्माण होतो. त्यातील शत्रूत्व बोलण्यातून, वागण्यातून व्यक्त होत असते.”
हे ही वाचा >> “भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं”, हसन मुश्रीफांच्या विधानाने ‘खळबळ’
“एकमेकांच्या कॉलनींमध्ये घर न मिळण्यापासून ते एकमेकांसोबत उच्च-नीच आणि तिरस्काराची वागणूक दिल्या गेल्याचे कटू अनुभव आहेत. हिंसा, दंगे, छळ इत्यादी घटनांचा दोष एकमेकांवर लावण्याच्या घटनाही घडतात. काही लोकांची कृत्य पूर्ण समाजाचं असल्याचे समजून बोलण्यांवर आणि विचारांवर नियंत्रण ठेवलं जात नाही. आव्हान प्रतिआव्हान दिली जातात, जे चिथावणी देण्याचं काम करतात”, असं मोहन भागवत म्हणाले.
“फुटीरता आणि संघर्ष व्हावा म्हणून काही लोक प्रयत्न करताहेत”
“आपला देश पुढे जात आहे. आत्मविश्वास वाढत आहे. जगाला रस्ता दाखवायचा असेल तर कुणाची कॉपी करायची गरज नाही. आपल्याला आपला मार्ग तयार करावा लागेल. एक यशस्वी प्रयोग जगाला द्यायचा आहे. भारतात असे काही लोक आहेत ज्यांना वाटत की भारत उभा राहू नये. फुटीरता आणि संघर्ष कसा तयार होईल, यासाठी ते प्रयत्न करतात”, असंही सरसंघचालक म्हणाले.
हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘ती’ जाहिरात शिंदे सरकारच्या अंगलट, 24 तासांत डॅमेज कंट्रोल?
“भारताच्या उदयाचे ध्येय नेहमीच जगाचे कल्याण आहे. पण, स्वार्थी, भेदभाव करणाऱ्या आणि कपटी शक्तीही आपल्या जातीय हितसंबंधांसाठी सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा आणि संघर्षाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. ते विविध प्रकारचे वस्त्र परिधान करतात. सांस्कृतिक मार्क्सवादी अराजकता आणि अतार्किकतेचा पुरस्कार करतात, प्रोत्साहन देतात आणि पसरवतात. त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये माध्यमे आणि शैक्षणिक संस्थांवर नियंत्रण ठेवणे आणि शिक्षण, संस्कृती, राजकारण आणि सामाजिक वातावरण गोंधळ, अराजकता आणि भ्रष्टाचारात बुडवणे समाविष्ट आहे”, असं मोठं विधान भागवतांनी केले.
ADVERTISEMENT