Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत 'या' महिलांसाठी मोठी अपडेट!

रोहिणी ठोंबरे

24 Oct 2024 (अपडेटेड: 24 Oct 2024, 12:36 PM)

Mukhymantri Mazi ladki bahin yojana : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या जातात. अशाचप्रकारे भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील सरकारही आपल्या नागरिकांसाठी विविध योजना सुरु करतात.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी बातमी

point

'या' महिलांसाठी महत्त्वाची अपडेट!

Mukhymantri Mazi ladki bahin yojana : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या जातात. अशाचप्रकारे भारताच्या वेगवेगळ्या राज्यांतील सरकारही आपल्या नागरिकांसाठी विविध योजना सुरु करतात. महाराष्ट्र सरकारने यावर्षी राज्यातील महिलांसाठी एक मोठी स्कीम सुरु केली आहे. त्या योजनेचं नाव लाडकी बहीण योजना असं आहे. जुलै महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana mahayuti sarkar apply form big update know it in detail )

हे वाचलं का?

लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. माहितनुसार, आत्तापर्यत 2 कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून दर महिन्याला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत. अशावेळी काही महिला अशाही आहेत ज्यांना अजूनपर्यंत 1 रूपयाही मिळालेला नाही आहे. त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

हेही वाचा : Salman Khan Case : लॉरेन्सच्या नावाने सलमानला धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, भाजीवाला म्हणाला मी...

'या' महिलांसाठी महत्त्वाची अपडेट!

महायुती सरकारची महत्वाकांक्षी असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’संपूर्ण महाराष्ट्रात तुफान चर्चेत आहे. याअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर असे 1500 रूपयांचे 5 हफ्ते म्हणजेच 7,500 रूपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. पण, अनेक महिलांना काहीच मिळालेलं नाही आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे.  

यामागील कारण म्हणजे या योजनेचा लाभ घेताना पात्र ठरण्यासाठी ज्या अटी, निकष आहेत त्यासाठी त्या महिला पात्र नसाव्यात. अर्ज भरणाऱ्या महिलांपैकी काहींचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती सरकारी नोकरदार असेल अशा महिला पात्र ठरत नाहीत. त्याचवेळी काही महिलांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नसल्यामुळे त्या योजनेपासून वंचित राहिल्या.

हेही वाचा : Gold Price Today : सोन्याला आली झळाळी, चांदीची चमकही प्रचंड वाढली! ऐन दिवाळीत खिशाला बसणार मोठा फटका

उर्वरित पात्र महिलांबद्दल बोलायचं झालं तर, कदाचित त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी असतील त्यामुळे त्यांच्या खात्यात एकही रूपया जमा झालेला नसावा.
 

    follow whatsapp