Today Gold Rate in Mumbai:सोन्याला आली झळाळी, चांदीची चमकही प्रचंड वाढली! ऐन दिवाळीत खिशाला बसणार मोठा फटका

रोहिणी ठोंबरे

24 Oct 2024 (अपडेटेड: 24 Oct 2024, 06:05 PM)

Gold Price in Maharashtra : गेल्या काही महिन्यांपासून सोनं -चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच असल्याचे दिसून येत आहे. आजही सोन्याच्या भावात काहीसा बदल झाला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं चांदी खरेदी आवाक्याबाहेरच आहे.

point

सोन्यासोबत चांदी खरेदी करणंही महाग पडणार.

point

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Gold-Silver Price Hike : गेल्या काही महिन्यांपासून सोनं -चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच असल्याचे दिसून येत आहे. आजही सोन्याच्या भावात काहीसा बदल झाला आहे. चांदीनेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता सोन्यासोबत चांदी खरेदी करणंही महाग पडणार आहे. चला तर मग आजचे (24 ऑक्टोबर 2024) सोने-चांदीचे दर जाणून घेऊया. (Gold-Silver price hike before diwali festival what are the rates of 24 22 and 18 carat gold on today 24 october 2024 in maharashtra)

हे वाचलं का?

भारतात सोने-चांदीच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. पण आज थोडं का होईना यामध्ये बदल झाला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हेही वाचा : Maharashtra Assembly Election 2024 LIVE : आज महायुतीचे अनेक उमेदवार करणार उमेदवारी अर्ज दाखल | Shiv Sena UBT| Maharashtra Assembly Election 2024 Updates|

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी (24 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 80,070 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 10 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 80,080 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,400 रूपये होता. त्यातही 10 रूपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 73,410 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 1 लाख 4,100 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे. 

हेही वाचा : Maharashtra Weather : महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस सुरू राहणार? वाचा IMD चा अंदाज

 

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

मुंबई

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,410 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,080 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,070 रूपये आहे.

पुणे

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,410 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,080 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,070 रूपये आहे.

नागपूर

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,410 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,080 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,070 रूपये आहे.

नाशिक

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,440 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,110 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,100 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

 

    follow whatsapp