Mia Khalifa Karwa Chauth: आरारारा खतरनाक! पॉर्न स्टार मिया खलिफासाठी आजोबांचा करवा चौथ, चक्क...

मुंबई तक

23 Oct 2024 (अपडेटेड: 23 Oct 2024, 05:37 PM)

Karwa chauth For Mia Khalifa Video Viral : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भन्नाट व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण एका वृद्धाने चक्क पॉर्नस्टारसाठी करवाचौथ केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिया खलिफासाठी करवा चौथ

मिया खलिफासाठी करवा चौथ

follow google news

बातम्या हायलाइट

point

पॉर्न स्टारसाठी पठ्ठ्यानं केला करवाचौथ

 Karwachauth For Mia Khalifa Video Viral : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भन्नाट व्हिडीओनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण एका वृद्धाने चक्क पॉर्नस्टारसाठी करवाचौथ केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. इंटरनेटवर पॉर्नस्टार म्हणून लोकप्रिय असलेल्या मिया खलिफाची (Mia Khalifa) सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. खलिफा फॅशन शो मध्ये सहभागी झाल्यानंतर वेगवेगळे व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट करत असते. तिच्या याच अदांचं वेड लागलेल्या एका व्यक्तीनं चक्क करवाचौथच केल्याचं समोर आलं आहे. मिया खलिफाला दिर्घायुष्य मिळावं, यासाठी या पठ्ठ्याने करवाचौथ केल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, टेरेसवर एक वृद्ध हातात चाळणी घेत मिया खलिफाच्या फोटोजवळ जातो आणि त्या चाळणीत मिया खलिफाला पाहतो. चाळणीत दिवा लावून तो मिया खलिफासाठी शुभाशीर्वाद मागत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या मनोरंजनासाठी तयार केला असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 

हे ही वाचा >>  Maharashtra Election: "चहावाले नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस मतांची भीख..."; अर्ज दाखल करताच अभिजीत बिचुकले कडाडले |Ajit Pawar Candidates List|

असा साजरा केला जातो करवाचौथ

20 ऑक्टोबर 2024 ला करवाचौथ साजरा करण्यात आला. सूर्योदय झाल्यापासून ते चंद्राचं उगम होईपर्यंत विवाहीत महिला करवाचौथ साजरा करत असतात. पतीला दिर्घायुष्य मिळावं, यासाठी महिलांचा हा अट्टहास असतो. चाळणीतील चंद्राला पाहून झाल्यावर महिला करवाचौथचा उपवास सोडतात. त्यानंतर पाणी आणि अन्न ग्रहन करून हा या उपवासाची सांगता केली जाते.

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: सरकारच्या घोषणेनंतरही खरंच मिळणार नाहीत 3000? महिलांनो दिवाळी बोनसचं सत्य एकदा जाणून घ्या

मिया खलिफासाठी उपवास करणाऱ्या या वृद्धाचा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. कारण वृद्धाने चक्क एका लोकप्रिय पॉर्नस्टारसाठी करवाचौथ केल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. करवाचौथचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण अशाप्रकारचा भन्नाट व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आल्याचं नेटकरी प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत. 

    follow whatsapp