Chwippy चे हायपर-लोकल सोशल मीडिया अ‍ॅप सुरू!

मुंबई तक

• 03:49 PM • 23 Oct 2024

Chwippy App: Chwippy हे नवं हायपर-लोकल अ‍ॅप सुरू करण्यात आलं आहे. व्यावसायिकांसाठी हे अ‍ॅप नक्कीच एक वरदान ठरू शकतं. जाणून घ्या त्याविषयी सविस्तर.

Chwippy सोशल मीडिया अ‍ॅप सुरू!

Chwippy सोशल मीडिया अ‍ॅप सुरू!

follow google news

बातम्या हायलाइट

point

Chwippy चे सोशल मीडिया अ‍ॅप लाँच

point

महाराष्ट्रातील ४४००० हून अधिक खेड्यांमध्ये अ‍ॅपचं अधिकृतरीत्या लाँचिंग

point

हे अ‍ॅप कुटिरोद्योग/गृहउद्योग चालवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना वरदान

Chwippy (https://chwippy.com) हा एक अभिनव हायपर-लोकल सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म असून महाराष्ट्रातील शहरांमध्ये, गावांमध्ये आणि ४४०००हून अधिक खेड्यांमध्ये त्याचे अधिकृतरीत्या लाँच करण्याची घोषणा करण्यात आली.

हे वाचलं का?

हा प्लॅटफॉर्म लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्यातील परस्पर संवाद वाढवण्यासाठी, आणि व्यापाराला चालना देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या मंचाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर लोकांचे विविध समुदाय तयार होतील आणि त्यांच्यात उत्साहवर्धक संवादाची देवाणघेवाण होईल. 

Chwippy  हे अ‍ॅप समान आवडी अथवा समान कार्यक्रमांच्या आधारे वापरकर्त्यांना जोडत असल्यामुळे, कुटिरोद्योग/गृहउद्योग चालवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना आपल्याच परिसरात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ते एक वरदान ठरेल.

हे ही वाचा>> Govt Job : NTPC मध्ये सरकारी नोकरीची संधी! 'एवढा' मिळणार पगार 

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये आणि इतरत्रही Chwippy  हे अ‍ॅप उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना आपल्या आसपासच्या परिसरातल्या घडामोडी, स्थानिक कार्यक्रम-उत्सव-समारंभ, इत्यादींचे रिअल-टाइम अपडेट्स सतत मिळत राहतील. 

Chwippy च्या रूपाने महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचे समाजमाध्यम तब्बल ४४००० पेक्षा जास्त खेड्यांपर्यंत पोचत असून ग्रामीण भागातील वापरकर्त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या नवीन प्रकारच्या कनेक्टिव्हिटीमुळे गावपातळीवरील विभिन्न समुदायांना जवळ आणण्यास मदत होईल आणि परस्परसहकार्याला चालना मिळेल. दुरावलेल्या समूहांना एकत्र बांधण्याचे कामही Chwippy करू शकेल.

चविप्पी वर लोक त्यांच्या स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देऊ शकतात जे ते जिल्हा आणि देशभरातील प्रत्येक जण पाहू शकतात

लाँचबद्दल बोलताना, Chwippy चे संस्थापक रामकृष्णन म्हणाले, “आपण जगभरातील लोकांच्या संपर्कात असतो, परंतु आपल्याच शेजाऱ्यांशी तुटलेले राहतो. Chwippy च्या माध्यमातून स्थानिक समुदायांमध्ये अनुबंध आणि सौहार्द वाढवणे हा माझा उद्देश आहे.”

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : महिलांनो, नोव्हेंबरपर्यंतचे 7500 आले,आता डिसेंबरचे 1500 कधी मिळणार?

ग्रामीण समुदायांसाठी एक महत्त्वाचा आवाज म्हणून Chwippy महत्त्वाची भूमिका बजावेल, विशेषत: मोठ्या महानगरीय क्षेत्रांमुळे दुर्लक्षित झालेल्या गावांमधील स्थानिक समस्यांविषयी जनजागृती करण्याऱ्या व्यक्तींना Chwippy च्या रूपाने एक व्यासपीठ मिळेल.

वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांवर उपाय शोधण्यासाठी चर्चा करण्याकरिता एक मंच म्हणून Chwippy चा उपयोग होईल.

अधिक माहितीसाठी, https://chwippy.com  या साइटला भेट द्या.

हे अ‍ॅप Androidhttps://play.google.com/store/apps/details?id=com.chwippy.app&hl=en_IN

iOShttps://apps.apple.com/pl/app/chwippy/id6463095960

या दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप उपलब्ध आहे


व्हिडिओ पूर्वावलोकन - https://www.youtube.com/watch?v=BSoYyaeA-JA 
 

    follow whatsapp