Cyclone Dana : दाना चक्रीवादळ भारतीय भुभागावर धडकणार, महाराष्ट्रावर किती परिणाम होणार?

मुंबई तक

24 Oct 2024 (अपडेटेड: 24 Oct 2024, 08:45 AM)

बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना हे चक्रीवादळ आज, 24 ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवर धडकणार आहे. ओडीशा आणि पश्चिम बंगालमध्ये हे वादळ आज भारतीय भुभागावर दाखल होणार असून, यावेळी ताशी 120 ते 130 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील.

दाना चक्रीवादळ

दाना चक्रीवादळ

follow google news

बातम्या हायलाइट

point

दाना चक्रीवादळ भारतीय भुभागावर धडकणार

point

महाराष्ट्राच्या वातावरणात बदल होणार?

point

कुठे-कुठे होणार वादळाचे परिणाम?

IMD Weather Forecast Cyclone Dana: बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना हे चक्रीवादळ आज, 24 ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवर धडकणार आहे. ओडीशा आणि पश्चिम बंगालमध्ये हे वादळ आज भारतीय भुभागावर दाखल होणार असून, यावेळी ताशी 120 ते 130 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील. या वादळामुळे महाराष्ट्राला किती धोका पोहोचणार याबद्दल सध्या नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं आधीच मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसणार का? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. (Cyclone Dana effects on Maharashtra IMD Weather Forecast)

हे वाचलं का?


हे ही वाचा >>Shivadi Vidhan Sabha : शिवडीच्या जागेचा मुद्दा शिगेला? अजय चौधरी की सुधीर साळवी? 'या' नेत्याचं पारडं जड

 
दाना चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आज जोरदार वारे वाहतील अशी शक्यता आहे. हवामान विभागाने त्यानुसार पश्चिम बंगाल आणि ओडिसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मात्र तुर्तास महाराष्ट्राला या वादळाचा मोठा धोका नसणार आहे. हवामान विभागाचे के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिशापासून 560 किमी अंतरावर हे वादळ दाना नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं. त्यामुळे बंगालच्या उपसागरात यामुळे तीव्र चक्रीवादळाची शक्यता आहे. 24 च्या रात्रीपासून ते 25 च्या सकाळपर्यंत पुरी आणि सागर बेटाच्या परिसरात भारतीय भुभागाला धडकणार आहे. 

 

हे ही वाचा >>मयुरेश वांजळे मनसेतून लढणार! तिकीट मिळताच आईला अश्रू अनावर

 

दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांमध्ये एनडीआरएफची अनेक पथकं तैनात आहेत. आज संध्याकाळपासून उद्या सकाळपर्यंत कोलकाता विमानतळावर उड्डाणंही थांबवण्यात आली आहेत. 150 हून अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या वादळाचा प्रभाव थेट बिहार आणि झारखंडपर्यंत दिस शकतो, मात्र महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याचा अंदाज आहे.

    follow whatsapp