Mumbai Kurla BEST Bus Accident : अपघातग्रस्त BEST बस चालक 9 दिवसाआधीच नोकरीला लागला? धक्कादायक माहिती उघड

मुंबई तक

10 Dec 2024 (अपडेटेड: 10 Dec 2024, 03:16 PM)

Kurla BEST Bus Accident News: कुर्ला परिसरात काल रात्री 9:36 मिनिटाला घडलेल्या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, 30 च्या आसपास लोक जखमी असल्याची माहिती आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

कुर्ला बेस्ट बस अपघातात 5 जणांचा मृत्यू

point

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

point

अपघातग्रस्त बसचा चालक मद्यधुंद नव्हता?

Mumbai Kurla BEST Bus Accident : कुर्ला परिसरात घडलेल्या बस अपघाता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालकाला बस चालवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता. त्याला कोणतंही मोठं वाहन चालण्याचा अनुभव नव्हता असं पोलीस तपासात उघड झालं आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चालक सुभाष मोरे हा 1 डिसेंबरलाच कंत्राटी पद्धतीनं रूजू झाला होता. अवघ्या 9 व्या दिवशीच म्हणजे 9 डिसेंबरच्या रात्री हा अपघात झाला अशी माहिती टीव्ही 9 मराठीने दिली आहे. 

हे वाचलं का?

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये बसमध्ये कुठलाही बिघाड नव्हता अशीही माहिती समोर आहे. 'बेस्ट'ची बस चालवण्यासाठी देण्यापूर्वी कधीही त्या चालकाचा अनुभव गृहीत धरूनच नेमणूक करण्यात येते, मात्र या चालकाला मोठं वाहन चालवण्याचा अनुभवच नव्हता असं समोर आलं आहे. 

हे ही वाचा >> Kurla Best Bus Accident : भरधाव BEST बस मार्केटमध्ये घुसली, लोकांना चिरडलं, पाच जणांचा मृत्यू, 30 जखमी

कुर्ला परिसरात काल रात्री 9:36 मिनिटाला घडलेल्या घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, 30 च्या आसपास लोक जखमी असल्याची माहिती आहे. तसंच अनेकजण गंभीर जखमी असल्यानं मृत्यूचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. 

हे ही वाचा >>Inside Story: खळबळजनक! भाजप आमदाराच्या मामाचा मृतदेहच सापडला, कोणी केली हत्या?

घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी बसचालक मद्यधुंद असल्याचा आरोप करत आहेत. मात्र, या घटनेच्या चौकशीनंतर बसचालक मद्यधुंद नसल्याचं समोर आलं आहे. एकूणच या घटनेनंतर बेस्टमध्ये केल्या जाणाऱ्या भरतीसाठीचे निकष पाळले जात आहेत की नाही असाही सवाल उपस्थित होत आहे. 

कुर्ला परिसरातील एलबीएस रोडवर काल रात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातानं मुंबई अक्षरश: हादरली आहे. कुणी कुटुंबासोबत खरेदीसाठी आलं होतं, तर कुणी मुलांसाठी खाऊ तर कुणी भाजी विकत घेऊन जात होतं. अशातच बेस्टची एक बस भरधाव वेगात आली, मार्केटमध्ये घुसली आणि 30 पेक्षा जास्त लोकांना चिरडलं. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली असून, स्थानिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

    follow whatsapp