Mumbai Rains News : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मुंबई तक

13 May 2024 (अपडेटेड: 13 May 2024, 10:25 PM)

Mumbai News : घाटकोपरमध्ये असचं भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे.या होर्डिंगखाली 100 जण अडकल्याची माहिती मिळते आहे. या 100 जणांना आता वाचवण्यासाठी आता घाटकोपरमध्ये एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. आणि बचाव कार्याला सुरूवात झाली आहे.

mumbai news ghatkoper hording collaplsed 100 people stuck ndrf team for rescue mumbai rain

घाटकोपरमध्ये असचं भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे

follow google news

Mumbai weather forecast : मुंबईत आज झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे घाटकोपरमध्ये (Ghatkoper) भलं मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत आता 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत 59 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. अद्याप अनेकजण या होर्डिंगखाली अडकून पडले आहेत. त्यांनाही युद्धपातळीवर बचाव करण्याचे प्रयत्न सूरू आहेत. (mumbai news ghatkoper hording collaplsed 100 people stuck ndrf team for rescue mumbai rain) 

हे वाचलं का?


घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये ही घटना घडली आहे. रमाबाई नगर जवळ एक पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपच्या समोरच हे भलं मोठं होर्डिंग उभं होते. ज्यावेळेस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली, त्यावेळेस हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याची घटना घडली होती. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस अनेक जण पंपावर पेट्रोल भरत होते. तसेच अनेकांची या पेट्रोल पंपा शेजारी दुकाने देखील होती. त्यामुळे हे होर्डिंग कोसळून 100 हून अधिक जण होर्डिंगखाली दबल्याची माहिती मिळाली होती.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : पंतप्रधानांच्या 'त्या' विधानावर ठाकरे प्रचंड चिडले

होर्डिंगखाली दबलेल्या नागरीकांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी एनडीआऱएफला पाचारण करण्यात आले आहे. तसेच इतर बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाली आहेत. आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.  

जाहिरात कंपनीविरोधात पोलिसात तक्रार 

दरम्यान घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून 35 जण जखमी झाल्याप्रकरणी बीएमसी रेल्वे आणि जाहिरात कंपनी इगो मीडियाविरोधात तक्रार दाखल करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली जाईल,असे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. 

हे ही वाचा : मी सांगितलं होतं, 'ते' वायनाडमधून पळून जातील आणि... : मोदी

फडणवीसांचे चौकशीचे आदेश 

घाटकोपर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 47 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मुंबई पोलिस, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्ध स्तरावर करण्यात येत आहेत. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. तसेच या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर सांगितले आहे.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? 

घाटकोपरच्या या दुर्घटनेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घाटकोपरची घटना अतिशय दुदैवी आहे. या घटनेनंतर तत्काळ महापालिका आयुक्त आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटला सूचना देऊन ताबडतोब बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घटनेत 57 लोकांना होर्डिंग खालून बाहेर काढण्यात आले आहे, आणि जखमींना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

या घटनेतील जखमींवर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत. त्याचबरोबर या घटनेत जे मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखाची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईतील होर्डिंगचे स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्टचर ऑडिट करा आणि विनापरवाना होर्डिंगवर गुन्हे दाखल करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

    follow whatsapp