Nanded : नांदेडच्या रुग्णालयात मृत्यूचा थयथयाट! 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू

मुंबई तक

02 Oct 2023 (अपडेटेड: 02 Oct 2023, 01:18 PM)

नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दिवसात 12 बालकांचा आणि 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. औषध पुरवठ्यात असणाऱ्या अनास्थेमुळे हा प्रकार घडल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Nanded government hospital baby born death

Nanded government hospital baby born death

follow google news

Nanded News : हाफकीनने औषध खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा (Supply medicines) होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील (Nanded Government Hospital) पुढे आला आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये गंभीर बाब म्हणजे 12 नवजात बालकांचाही (12 newborn baby) मृतांमध्ये समावेश आहे. (Nanded government hospital 24 patients including 12 newborns have died)

हे वाचलं का?

आरोग्य यंत्रणेची लक्तरे

नांदेड शासकीय रुग्णालयात या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांमध्ये बाहेरच्या रुग्णांचा जास्तीचा समावेश होता असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केले जाते आहे.

हे ही वाचा  >> Sanjay Raut : ‘राष्ट्रवादीच्या पे रोलवर काम करणाऱ्यांनी…’, शिंदेंच्या नेत्याचा राऊतांवर पलटवार

प्रशासनावर प्रश्न

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 24 जणांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण या मृतांमध्ये बालकांचाही समावेश असल्याने ही बाब गंभीर असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पालक चिंताग्रस्त

शासकीय रुग्णालयात वेगवेगळ्या कारणामुळे बालकांचा मृ्त्यू झाला असला तरी सध्या अनेक पालक चिंताग्रस्त झाले आहेत. शासकीय रुग्णालयामध्ये बालकांचा आणि इतर रुग्ण दगावण्याच्या घटना वाढीस लागल्यामुळे प्रशासन नेमके काय करते असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा  >> Bihar Caste Census : बिहारमध्ये 63% ओबीसी, 15.2% ओपन; जात जनगणनेतील 10 मुद्दे

औषधाविना मृत्यू

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 12 बालकांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. औषधांचा तुटवडा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा सगळा खेळ रुग्णांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. रुग्णालयातील औषध साठा कमी असल्याच्या प्रतिक्रिया गेल्या कित्येक दिवसांपासून उमटत आहेत. त्यामुळे औषधाविना रुग्णांचा मृत्यू झाला आहे का असा संतप्त सवाल पालक वर्गासह नागरिकांनी केला आहे.

    follow whatsapp