New Parliament : देशाच्या नव्या संसद भवनाच्या कामकाजाची आजपासून सुरुवात होत आहे. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी कामकाजाला प्रारंभ होणार आहे. तर त्याच भवनमध्ये 2 वाजून 15 मिनिटांनी राज्यसभेच्या (Rajyasabha) कामकाजाला सुरुवात होणार आहे. या नव्या संसद भवनाची सर्व तयारी करण्यात आली आहे. तर या नव्या संसदभवनामध्ये 1280 सदस्य बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या संसद भवनची चर्चा सुरु असली तरी त्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अत्याधुनिक आणि विशाल अशा परिसरात या संसद ( Parliament) भवनची निर्मिती करण्यात आली आहे. त्या संसद भवनच्या निर्मितीसाठी किती खर्च (New Parliament Budget) करण्यात आला आहे हे तुम्हाला माहित आहे का. तर त्या भवनची ही आहेत खास वैशिष्ट्ये.(new parliament opening cost about rs 1200 crore built tata company know these 5 special pm narednra modi)
ADVERTISEMENT
आजपासून देशाच्या नव्या संसद भवनमध्ये कामकाजाला सुरुवात होत आहे. दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी लोकसभेच्या कामकाजाची कार्यवाही सुरु होणार आहे. तर त्याचवेळी 2 वाजून 15 मिनिटांनी राज्यसभेची कार्यवाही सुरु होणार आहे. या वेळेत कामकाज सुरु होणार असल्यानमुळेच आधीच कामकाजाची तयारी करण्यात आली आहे. त्या नव्या संसद भवनची ही आहे पाच खास वैशिष्ट्ये.
हे ही वाचा >> ‘गणराया, लोकशाहीवरील विघ्न दूर कर !’, ‘सामना’तून जनतेसाठी साकडं
विशेष बैठकव्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यामध्येच या नव्या संसद भवनचे उद्घाटन केले होते. या भव्य दिव्य नव्या संसद भवनमध्ये लोकसभा कक्षामध्ये 888 सदस्य तर राज्यसभा कक्षेमध्ये 300 सदस्य आरामामध्ये बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. जर या दोन्ही सदनांची बैठक घेण्याचे ठरले तर लोकसभा चेंबरमध्ये किमान 1280 सदस्य बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
इमारतीचे बजेट होतं 971 कोटींचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 डिसेंबर 2020 रोजी संसदेच्या नव्या इमारतीची पायाभरणी केली होती. त्यानंतर तीन वर्षाच्या आधीच या इमारतीची उभारणी करण्यात आली. नव्या संसदेची इमारत ही 64, 500 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे. ही चार मजली इमारत त्रिकोणी आकाराची आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ही नवी संसद जुन्या संसद भवनपेक्षा 17,000 चौरस मीटर मोठे आहे. ज्या प्रमाणे ही इमारत भव्य दिव्य आहे, त्याच प्रमाणे त्याला अत्याधुनिकतेचीही जोड देण्यात आली आहे. या इमारतीवर भूंकंपाचाही कोणताही परिणाम त्यावर होणार नाही. इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी ही टाटा प्रोजक्टला देण्यात आली होती. त्या बांधकाकामाची अंदाजे किंमत होती, 971 कोटी रुपये एवढी.
या कारणामुळे वाढलं बजेट
नव्या संसद भवनच्या पायाभरणीनंतर टाटा प्रोजेक्टने इमारतीच्या बांधकामाला वेगाने सुरुवात झाली. मात्र जानेवारी 2022 नंतर मात्र संसद बांधणीच्या खर्चात वाढ होऊन 200 कोटीने खर्च वाढल्याचे सांगण्यात आले. कारण या काळातच स्टील, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर कामांच्या किंमती वाढल्याने बांधकाम खर्च वाढत असल्याचे जाहीर करण्यात आले. हा खर्च वाढण्यास आधुनिक ऑडिओ-व्हिडिओ व्हिज्युअल सिस्टीम, खासदारांच्या टेबलावरील बोर्ड यासारख्या गोष्टींचा खर्च वाढल्याने नव्या इमारतीच्या खर्चात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 200 कोटी रुपयांच्या वाढीनंतर संसद भवनचे बजेट 1200 कोटी रुपयांपर्यंत वाढणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता ही इमारत नव्या कामाकाजासाठी सज्ज झाली असून आजपासून या नव्या संसदेचे कामकाज सुरु होत आहे.
हे ही वाचा >> Parliament Special Session : मोदी सरकारचा मोठा निर्णय! महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी
हायटेक व्यवस्था
भारताची नवी संसद भवन भव्यदिव्य आहे. त्याच प्रमाणे त्या इमारतीची सर्वबाजूने तयारीही केली आहे. ज्या प्रमाणे भूकंपाचा धोका या इमारतीला नाही. त्याच प्रमाणे सुरक्षेच्यादृष्टीनेही त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीला सहा प्रवेशद्वार असून अश्व, गज आणि गरुड हे दरवाजे तयार करण्यात आले आहेत. या प्रवेशद्वारातूनच उपराष्ट्रपती, सभापती व पंतप्रधान प्रवेश करणार आहेत. तर इतर तीन प्रवेशद्वारामधून खासदार आणि इतर नागरिक प्रवेश करु शकणार आहेत. खासदार आणि नागरिकांसाठी मकर गेट, शार्दुल गेट आणि हंस गेट अशी निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये कॅफे, डायनिंग एरिया आणि कमिटी मीटिंगच्या वेगवेगळ्या रूममध्येही हायटेक उपकरणं बसवण्यात आली आहेत. कॉमन रूम, लेडीज लाउंज आणि व्हीआयपी लाउंजचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या कंपनीने केली नव्या संसदेची निर्मिती
भारताच्या नव्या संसद भवनाची रचना ही गुजरातमधील आर्किटेक्चर फर्म एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि मुख्य आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केली आहे. बिमल पटेल यांनी या आधीही अनेक भव्यदिव्य कामं केली आहेत. बांधकाम क्षेत्रातील त्यांच्या कामासाठी त्यांना 2019 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी विश्वनाथ धाम काशी विश्वनाथ मंदिर, गुजरात हायकोर्ट बिल्डिंग, आयआयएम अहमदाबाद कॅम्पस, टाटा सीजीपीएल टाउनशिप, साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि पंडित दीनदयाल पेट्रोलियम विद्यापीठसारख्या भव्य दिव्य इमारतींचे काम केले आहे.
ADVERTISEMENT