Nitin Gadkari Speech : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नेत्यांचे कान टोचले. इतकं नाही तर कामचुकार ठेकेदारांनाही त्यांनी सज्जड दम भरला. नागपूरमधील कार्यक्रमात नितीन गडकरींनी केलेले हे भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. (Nitin Gadkari Speech in Nagpur)
ADVERTISEMENT
नागपूरमध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी राजकीय नेते, अधिकारी आणि ठेकेदार सगळ्यांचे कान पिळले. गडकरी म्हणाले, “तीन-चार दिवस पावसात फिरेन. जर कुठे पाणी भरलं, तर लोकांना घेऊन आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करू.”
गडकरींच्या नेत्यांना कानपिचक्या
केंद्रीय गडकरींनी राजकीय नेत्यांनाही सुनावलं. ते म्हणाले, “नेत्यांना त्यांच्या मुलाच्या रोजगाराची चिंता असते. अर्धे नेते तर हेच म्हणतात की, माझ्या पत्नीला तिकीट द्या. माझ्या चमचाला तिकीट द्या. ड्रायव्हरला तिकीट द्या. त्यांच्याकडे चौथे नाव नसतेच. फारच झालं तर म्हणतात की, माझ्या जातीतल्या माणसाला तिकीट द्या.”
वाचा >> ‘त्यांनी घडवले ते प्रदीप कुरुलकर’, राऊतांनी RSS, फडणवीसांना काय सुनावलं?
“देवेंद्र फडणवीस यांची मुलगी अजून फार छोटी आहे, पण आम्ही लोकांनी असा निर्णय घेतला आहे की, आपल्या मुलांची चिंता करायची नाही. तुमच्या मुलांची काळजी करायची आहे. मिहानमध्ये जगभरातील फार मोठ्या कंपन्या आल्या आहेत. आतापर्यंत नागपूरमधील 68 हजार लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळाला आहे”, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
कंत्राटदारांना गडकरींचा दम
सार्वजनिक कामं करणाऱ्या कंत्राटदारांनाही गडकरींनी इशारा दिला. गडकरी म्हणाले, “जो कुणी कंत्राटदार खराब काम करेल, त्याला ब्लॅक लिस्ट करा. जो कुणी खराब काम करेल त्याच्यावर कारवाई करा. कंत्राटदाराला बाद करा, कारण आपण काही लक्ष्मी दर्शन केलेलं नाही. ठेकेदारांनो याद ठेवा, जर खराब काम केले, तर तुमच्यावर बुलडोजर चालवला जाणार. त्यामुळे चांगलं काम करा.”
वाचा >> Ratnagiri: नीलिमा चव्हाण शेवटची भेटलेली ‘त्या’ जोडप्याला.. नेमकं काय घडलं?
नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा नितीन गडकरींनी वर्ग घेतला. अधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, “पावसाळा सुरू आहे. नाले पूर्ण साफ झालेले पाहिजे. आता मी चार-पाच दिवस नागपूर राहणार आहे. पाऊस झाल्यानंतर मी शहरात फिरणार आहे. पाऊस आला आणि जर कुठे पाणी साचलं, तर मी लोकांना घेऊन महापालिका आयुक्तांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करेन”, असा इशारा गडकरींनी दिला.
ADVERTISEMENT