Palghar : शार्क माशाने पायच तोडला! वैतरणा खाडीत भयंकर घटना

मुंबई तक

14 Feb 2024 (अपडेटेड: 14 Feb 2024, 10:15 AM)

Shark Attack in Palghar : मनोर/पालघर : पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लाकडे आणण्यासाठी खाडी पात्र ओलांडणाऱ्या एका तरूणावर शार्क माशाने (Shark Fish) हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की शार्क माशाने त्याच्या पायाचा अक्षरश लचकाच तोडला होता.

पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लाकडे आणण्यासाठी खाडी पात्र ओलांडणाऱ्या एका तरूणावर शार्क माशाने (Shark Fish) हल्ला केल्याची घटना घडली आहे.

palghar news shark fish attacked on boy vaitarna river paghar shocking story

follow google news

Shark Attack in Palghar : मनोर/पालघर  : पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लाकडे आणण्यासाठी खाडी पात्र ओलांडणाऱ्या एका तरूणावर शार्क माशाने (Shark Fish) हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की शार्क माशाने त्याच्या पायाचा अक्षरश लचकाच तोडला होता. विकी सुरेश गोवारी (वय 32) असे या तरूणाचे नाव असून सुदैवाने या घटनेतून तो बचावला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. (palghar news shark fish attacked on boy vaitarna river paghar shocking story)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, विकी गोवारी हा तरूण लाकडे आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. लाकडांसाठी त्याला वैतरणा खाडी ओलांडावी लागणार होती. यावेळी खाडी पात्र ओलांडताना त्याच्यावर शार्क माशाने हल्ला केला होता. हा हल्ला इतका भयंकर होता की शार्क माशाने त्याच्या पायाचा लचकाच तोडला होता. या घटनेनंतर जखमी तरुणाला गायकवाड डोंगरीवरील ग्रामस्थांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

हे ही वाचा : मनोज जरांगेंची प्रकृती ढासळली, नाकातून येतंय रक्त

दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांना शार्क माशाला पकडण्यात यश आले आहे. या शार्क माशाचे वजन सुमारे दोनशे किलो असल्याची माहिती आहे. मनोर ग्रामपंचायत हद्दीतील गायकवाड डोंगरीच्या ग्रामस्थांनी या शार्क माशाला पकडले होते. शार्कच्या या हल्ल्यात विकी गोवारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला आता उपचारासाठी सिल्वासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

हे ही वाचा : अजित पवारांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं

    follow whatsapp