Jalgaon Train Accident Video: जळगावात रेल्वे दुर्घटना! आगीच्या भीतीत ट्रॅकवर उड्या मारलेल्या प्रवाशांना बंगुळुरु एक्स्प्रेसने उडवलं!

Pushpak Express Railway Accident :  जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावहून मुंबईला निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारल्या.

Jalgaon Train Accident News

Jalgaon Train Accident News

मुंबई तक

22 Jan 2025 (अपडेटेड: 23 Jan 2025, 10:07 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना!

point

आगीच्या भीतीत प्रवाशांनी ट्रेनमधून मारल्या उड्या

point

नेमकं घडलं तरी काय?

Pushpak Express Accident News:  जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावहून मुंबईला निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या मारल्या. परंतु, दुर्देवाने समोरून येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. पण या अपघातात जवळपास 11 प्रवासी मृत पावल्याचं समजते. तर 40 प्रवाशांना उपचारासाठी जळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  

हे वाचलं का?


"पुष्पक एक्स्प्रेस मुंबईला निघाली होती. जळगाव स्टेशन सोडल्यानंतर परांडा स्टेशनच्या आधी गाडीने ब्रेक दाबल्यानंतर चाकांचे घर्षण झाल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. काही प्रवासी दरवाज्यात बसले होते. त्यांना वाटलं आग लागली. आग लागली म्हणून प्रवासी ओरडू लागले. त्यामुळे लोकांनी ट्रेनच्या विरुद्ध दिशेला उड्या मारल्या. पण समोरून बंगळुरु एक्स्प्रेस येत होती. त्या ट्रेनखाली काही लोक कापले गेले. अंदाचे नऊ ते दहा लोक असल्याचं प्रवाशांनी सांगितलंय", अशी माहिती घटनेचे प्रत्यक्षदर्शी बाबा जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.

हे ही वाचा >>  Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! अपात्र महिलांना पैसे परत द्यावे लागणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

इथे पाहा अपघाताचा थरारक व्हिडीओ

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अपघाताविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले, "जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. मृताच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदर देण्यात येत आहे".

    follow whatsapp