जका खान, बुलढाणा: आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत केस गळणे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सामान्य आहे. केस गळणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस विंचरताना करताना किंवा धुताना काही केस गळतात. खरं तर या गोष्टी सामान्य आहेत. पण बुलढाणा जिल्ह्यातील 5 गावांमधील अनेक लोकांचा टक्कल पडू लागलं आहे. अनेकांचे केस मोठ्या प्रमाणात गळत असल्याने या सगळ्या प्रकाराने ग्रामस्थ मात्र, भयभीत झाले आहेत. (people of many villages in buldhana district suddenly started going bald testing of water supply started)
ADVERTISEMENT
तथापि, जेव्हा एखाद्याचे केस मोठ्या भागात गळायला लागतात किंवा टक्कल पडू लागतात तेव्हा एखाद्याने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अनेक गावातील लोकांचे अचानक पडू लागले टक्कल
दरम्यान, मुंबई Tak च्या प्रतिनिधीने बुलढाणामधील या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांकडे याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी अचानक होऊ लागलेल्या केस गळतीबाबत माहिती दिली आहे. अगदी लहान मुलांपासून अबाल वृद्धापर्यंत अनेकांना टक्कल पडत असल्याचं यावेळी समोरल आलं.
हे ही वाचा>> Dombivali : मोबाईल वापरू नको, अभ्यासात लक्ष दे म्हटल्याच्या रागातून मुलीची थेट खाडीत उडी, पोलिसांनी...
बुलढाण्यातील अनेक गावातील लोकांना अचानक जास्त केस गळण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे काही दिवसांतच लोक टक्कल पडण्याची तक्रारही करू लागले आहेत. परिस्थिती अशी बनली आहे की, अधिकाऱ्यांना संभाव्य प्रदूषणासाठी स्थानिक पाणीपुरवठ्याची चाचणी सुरू करावी लागली आहे.
गावोगावी पाण्याचे नमुने तपासले जात आहेत
अशी प्रकरणे समोर आल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने मंगळवारी गावोगावी सर्वेक्षण सुरू केले आहे. बाधितांवर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती शेगावच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली बाहेकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत शेगाव तालुक्यातील कळवड, बोंडगाव, हिंगणा या गावातील 30 जणांना केस गळणे, टक्कल पडण्याची समस्या असल्याचे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा>> पुन्हा लॉकडाऊन? HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री, पाहा कुठे सापडले रुग्ण
त्वचा निगा तज्ज्ञांचाही सल्ला
विभागाकडून लक्षणांनुसार रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून, त्वचा निगा तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात येत असल्याचे बाहेकर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, संभाव्य दूषितता तपासण्यासाठी या गावांतील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले जात आहेत.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी सांगितले की, 'आम्हाला माहिती मिळताच आम्ही एक त्वचारोग तज्ञ आणि एक ओपीडोजोमोलिस्ट तज्ज्ञांना गावात पाठवले आहे. प्राथमिक तपासणीत डोक्याच्या त्वचेला 99 टक्के फंगल इंफेक्शन संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे.'
'आम्ही पाण्याची चाचणी देखील करू कारण जर पाण्यात काही हेवी मेटल्स आहेत का याचीही तपासणी केली जाईल. कारण यामुळे फंगल इंफेक्शन वाढतात. रुग्णांच्या त्वचेचे नमुने घेऊन मायक्रोस्कोपीसाठी अकोला वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात येणार आहेत.' अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.
ADVERTISEMENT
