PM Modi Speech : मोदींनी केली विश्वकर्मा योजनेची घोषणा, फायदा कुणाला?

भागवत हिरेकर

15 Aug 2023 (अपडेटेड: 15 Aug 2023, 06:04 AM)

pm modi speech in marathi : Prime Minister Narendra Modi on Tuesday hoisted the tricolor from the ramparts of the Red Fort. PM Modi announced the launch of a new scheme on Vishwakarma Yojana.

Prime Minister Narendra Modi said that in the coming time, on Vishwakarma Jayanti, we will start 'Vishvakarma Yojana'

Prime Minister Narendra Modi said that in the coming time, on Vishwakarma Jayanti, we will start 'Vishvakarma Yojana'

follow google news

PM Modi Speech, Vishwakarma Yojana : भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात गरिबांपर्यंत पोहोचलेल्या सर्व योजनांचा उल्लेख केला. यावेळी मोदींनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. विश्वकर्मा योजना काय आणि तिचा फायदा कुणाला होणार, हेच समजून घेऊयात… (Pm narendra modi 77th independence day 2023 speech, Announced new Schemes from red fort)

हे वाचलं का?

कुणाला फायदा होणार?

लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 13-15 हजार कोटी रुपयांची नवीन ताकद देण्यासाठी येत्या महिन्यात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आम्ही ‘विश्वकर्मा योजना’ सुरू करणार आहोत. या योजनेद्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना सरकार मदत करेल. यामध्ये सोनार, लोहार, न्हावी आणि चर्मकार या पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश करून त्यांना मदत केली जाईल. थोडक्यात केंद्राची ही योजना बारा बलुतेदारांसाठी असणार आहे.

वाचा >> PM Modi Speech : ‘मी पुन्हा येईन’, नरेंद्र मोदींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

त्यामुळे पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या योजनेतून आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जाणार आहे. या योजनेसंदर्भातील माहिती लवकरच सरकारकडून जाहीर केली जाऊ शकते.

8 कोटी लोकांनी व्यवसाय सुरू केला

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘आज देशाची क्षमता वाढत आहे. गरिबांसाठी एक एक पैसा खर्च करणारे सरकार असेल, तर त्याचा परिणाम काय होतो, ते पाहत आहात. मी तिरंग्याच्या साक्षीने १० वर्षांचा हिशोब देत आहे.’

पीएम मोदी पुढे म्हणाले की, ‘मुद्रा योजनेतून तरुणांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. या योजनेतून आठ कोटी लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला असून प्रत्येक व्यवसायाने 1-2 लोकांना रोजगार दिला आहे.’

वाचा >> अजित पवार माघारी फिरणार?, शरद पवारांची खळबळ उडवणारी ‘गुगली’

‘आम्ही लाखो कोटींचा घोटाळा थांबवला आहे आणि गरिबांच्या कल्याणासाठी अधिकाधिक पैसा खर्च केला आहे. यापूर्वी केंद्राकडून राज्याला ३० लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. गेल्या 10 वर्षांत आम्ही ते 100 लाख कोटी रुपये केले आहे’, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली.

जगभरातील तरुणांना आश्चर्य

‘देशाच्या युवा शक्तीवर माझा विश्वास आहे’, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. ‘युवाशक्तीमध्ये क्षमता आहे आणि त्याच युवाशक्तीला अधिक बळ देण्याच्या दृष्टीने आमची धोरणे आहेत. आपल्या देशातील तरुणांनी भारताला जगातील पहिल्या 3 स्टार्टअप इकोसिस्टममध्ये स्थान मिळवून दिले आहे. आज जगभरातील तरुण भारताची ही क्षमता पाहून आश्चर्यचकित झाले आहेत’, असा दावा मोदींनी लाल किल्ल्यावरून बोलताना केला.

    follow whatsapp