Pooja Khedkar Case Update : ट्रेनी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी लोकसेवा आयोगापुढे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप होतं आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांना हे दिव्यांग प्रमाणपत्र (Disablity Certificate) कसं मिळालं? याबाबतची आता मोठी माहिती समोर आली आहे. (pooja khedkar disability certifacte from ahmednagar district government hospital sergeon dr sanjay ghogare)
ADVERTISEMENT
पूजा खेडकर यांना अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रूग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभिलेख तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : Vidhan Parishad Election : "जयंत पाटलांचा उबाठाने ठरवून पराभव केला", शेलारांची 'पोस्ट'
अभिलेखाची पडताळणी केली असता पूजा खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय मंडळाने दिल्याचे आढळून आले आहे. 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2021 ला मानसिक आजाराचे प्रमाणात दिले गेले आहे. आणि 2021 मध्ये दोन्ही एकत्रित करून तत्कालीन वैद्यकीय मंडळाने त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले होते, अशी नोंद अभिलेखावर आढळून आली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिली आहे.
पुजा खेडकर यांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र देण्यात आले असे अनेक प्रमाण पत्र एमपीएसी व युपीएसी उत्तीर्ण झालेल्या आणि सध्या नोकरी करत असलेल्या सर्व प्रमाणपत्राची जात पडताळणी करतात. तशी पडताळणी झाली पाहिजे अशी मागणी जिल्हा दिव्याग संघटनेचे अध्यक्ष लक्षण पोकळे यांनी केली आहे.
हे ही वाचा : Majhi ladki bahin yojana New Rules : रेशन कार्डवर नाव नाही, मग असा भरा अर्ज!
नॉन क्रिमीलेयर प्रमाण पत्रावरून वाद
पूजा खेडकरने UPSC नागरी सेवा परीक्षेत पात्र होण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासोबतच नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र देखील जोडलो होते. पण पूजाच्या ओबीसी नॉन क्रीमिलीयर कँडिडेट असण्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उमेदवाराच्या वडिलांची संपत्ती 40 कोटी रुपये असेल तर त्यांच्या पाल्याचा ओबीसी नॉन क्रीमी लेयरमध्ये कसं गृहीत धरलं जाईल? असा सवाल उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT