Pooja Khedkar Case Update : ओंकार वाबळे, पूणे : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात नवीन नवीन खुलास्यांची मालिका सुरुच झाली आहे. ही मालिका संपण्याचं नावच घेत नाहीयेत. त्यात आता या प्रकरणात पूजा खेडकर यांनी तिसरं दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मात्र डॉक्टरांनी तो हाणून पाडला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र का नाकारलं होतं? हे जाणून घेऊयात. (pooja khedkar trainee ias try to attempt third disablity certificate what doctor says inside story)
ADVERTISEMENT
पूजा खेडकर यांनी युपीएससीसाठी पात्र ठरण्यासाठी दृष्टीदोष आणि मानसिकरिकरित्या आजारी असल्याची प्रमाणपत्र आधीच सादर केली होती. या प्रमाणपत्रानंतर देखील पूजा खेडकर यांनी तिसरं लोकोमोटर डिसॅबिलीटी प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केल्याची मोठी माहिती समोर आली आहे.मात्र पूजा खेडकर यांचा हा प्रयत्न फसला होता.
हे ही वाचा : Vishalgad : "...ही घटना टळली असती"; शाहू महाराज संतापले, सरकारला सुनावले
त्याचं झालं असं की, पूजा खेडकर यांनी ऑगस्ट 2022 मध्ये पुण्यातील औंध हॉस्पिटलमधून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता, सुत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे. या अर्जानंतर पूजा खेडकर यांची चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी केल्यानंतर पूजा खेडकर यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. डॉक्टरांनी 'दिव्यांग प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याचे'' म्हणत पूजा खेडकर यांचा अर्ज फेटाळून लावला होता,अशी सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान लोकोमोटर डिसॅबिलीटी प्रमाणपत्र म्हणजे सेरेब्रल पाल्सीच्या कोणत्याही स्वरूपाचा किंवा हाडे, सांधे किंवा स्नायूंची स्थिती जी अवयवांच्या हालचालींवर लक्षणीय प्रतिबंध करते.
हे ही वाचा : Nashik News : पावसात फिरायला गेले आणि अडकले...,अंजनेरी गडावर भयंकर थरार
विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी यापूर्वी दोन वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केली होती. ज्यामध्ये एक दृष्टीदोष आणि दुसरं मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र होतं. ही प्रमाणपत्र अपंग श्रेणीअंतर्गत युपीएससीकडे सादर करण्यात आली होती. ही दोन्ही प्रमाणत्रे त्यांना अहमदनगर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलतर्फ देण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे ही दोन्ही प्रमाणपत्र वेगवेगळ्या समित्यांनी मंजूर केली होती. एक प्रमाणपत्र 2018 ला आणि दुसरं प्रमाण 2021 साली मंजूर करण्यात आलं होतं.
प्रकरण काय?
पुण्यातील प्रशिक्षणार्थी असताना पूजा खेडकर यांनी अनेक सुविधांची मागणी केली होती. खरं तर या सुविधा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मिळत नाहीत. तरीही पूजा खेडकर यांनी लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली तिची वैयक्तिक ऑडी कार वापरली होती, त्यांनी आपल्या वाहनावर 'महाराष्ट्र सरकार' असा फलक लावला आणि अधिकृत गाडी, निवास, कार्यालय कक्ष आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. इतकचं नाही तर त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरवरही ताबा मिळवला. होता.
या सर्व प्रकरणानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकरची तक्रार केली. त्यानंतर पूजाची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती.
ADVERTISEMENT